News Flash

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस २० वर्षे कारावास 

या प्रकरणी तिच्या आईने जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली होती

(संग्रहित छायाचित्र)

कोल्हापूर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी ५४ वर्षीय आरोपीस गुरुवारी २० वर्ष कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.  मोहंमद रफिक शेख असे या आरोपीचे नाव आहे.

आरोपी हा येथील संभाजीनगरातील ताराराणी कॉलनीमध्ये राहतो. त्याच्या शेजारीच सात वर्षीय पीडित मुलगी राहत होती. ३० सप्टेंबर २०१५ रोजी तिला खीर खायला देतो असे आमिष दाखवून त्याने घरी नेले. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार  केला. बराच वेळ मुलगी बाहेर आली नाही म्हणून शेजाऱ्यांनी पाहिले असता तो दुष्कृत्ये करताना रंगेहात पकडला गेला. नागरिकांनी मुलीची सुटका करून आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

या प्रकरणी तिच्या आईने जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली होती. आरोपीविरोधात दोषारोप पत्र सादर करण्यात आले होते. सात साक्षीदार व सहायक सरकारी वकील श्रीमती ए. ए. पाटोळे यांचा युक्तिवाद ग्रा मानून जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस. आर. पाटील यांनी आरोपीस वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली.जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस अधिकारी एम. आर. मोरे यांनी तपास कामी सहकार्य केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 25, 2021 12:14 am

Web Title: accused sentenced to 20 years imprisonment over minor girl abuse zws 70
Next Stories
1 कोल्हापुरात आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये ‘सन्मानाचा सामना’
2 इचलकरंजीतील ‘पॉपलीन’ कापड कारखाने बंद राहणार
3 कोल्हापुरात मराठा समाजाचे आंदोलन
Just Now!
X