शिवसेनेकडून महालक्ष्मीची महाआरती

कोल्हापूर : शिवसेना नेते व युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरात राम मंदिर होण्यासाठी साकडे घातले. महाआरती करत राम मंदिर उभारणीसाठी त्यांनी शिवसेनेचे पुढचे पाऊल टाकले. चुनावी जुमला करणारे सरकार सत्तेत येऊ  नये, अयोध्येत राम मंदिर निर्माण व्हावे, महाराष्ट्र राज्य दुष्काळमुक्त राहू दे, अशा भावना त्यांनी या वेळी व्यक्त केल्या.

अयोध्येत राम मंदिर उभारणी होण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे अयोध्येला गेले होते. त्यांनी तेथे शरयू नदीकाठी महाआरती केली होती. त्यानंतर शिवसेनेकडून या बाबतीत भरीव असे पुढे काही घडले नव्हते. मात्र, आज कोल्हापूर दौऱ्यावर आलेले आदित्य ठाकरे यांनी सायंकाळी ७  वाजता करवीर निवासिनी महालक्ष्मीचे दर्शन घेतले. या वेळी ‘अब हर हिंदू की एक ही पुकार, पहले मंदिर फिर सरकार’, ‘जय श्री राम जय श्री राम’ अशा घोषणा शिवसैनिकांनी देत मंदिर परिसर दणाणून सोडला.

या वेळी अयोध्येत श्री राम मंदिर उभारण्यात यावे यासाठी शिवसेना आणि सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने मंदिराच्या आवारात महाआरती करण्यात आली. जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, संजय मंडलिक, आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, दुर्गेश लिंगरज, वैशाली क्षीरसागर, शिवाजी जाधव, हर्षल सुर्वे उपस्थित होते.

ठाकरे बेळगाव विमानतळावर दाखल झाले. बेळगाव, कोल्हापूर जिल्ह्यतील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जोरदार घोषणा देत स्वागत केले. दोन दिवस दौऱ्यावर असलेले ठाकरे हे कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघात अनेक कार्यR मांना हजेरी लावून विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची उमेद वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. चंदगड तालुक्यातील शिनोळी येथे आणि गडहिंग्लज तालुक्यात त्यांचे काही कार्यR म झाले. संग्राम कुपेकर यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट देऊन चर्चा केली.

राजकीय भाष्य टाळले

केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालयात आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कटाक्षाने राजकारणावर बोलण्याचे टाळले. त्यांनी युवकांच्या भावी आयुष्यात चालना देणाऱ्या विविध घटकांसंदर्भात चर्चा केली. या वेळी ते म्हणाले, की युवकांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात फक्त राजकारण करून चालणार नाही तर आवडीच्या क्षेत्रात मग ते उद्योग, व्यापार, Rीडा किंवा अन्य कोणतेही असो. त्यात पारंगत झाले पाहिजे. देशाच्या सर्वागीण उन्नतीसाठी प्रत्येक क्षेत्र महत्त्वाचे आहे. शिवसेनेचे संपर्कप्रमुख व संस्था सचिव प्रा. सुनील शिंत्रे, संस्थेच्या अध्यक्षा अंजना रेडेकर उपस्थित होते.