23 February 2020

News Flash

खंडपीठ मागणीसाठी कोल्हापुरात वकिलांचे धरणे आंदोलन

पहिल्या टप्प्यात मंगळवारी जिल्ह्यातील सर्व वकील न्यायालय कामकाजापासून अलिप्त राहिले.

प्रतिनिधिक छायाचित्र

कोल्हापूर : कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरू करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी जिल्ह्यातील वकिलांनी कामकाजापासून अलिप्त राहत कसबा बावडा येथील न्याय संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळ धरणे आंदोलन केले.

कोल्हापूरसह आसपासच्या सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापुरात खंडपीठाचे कामकाज सुरू व्हावे, अशी मागणी गेल्या ३० वर्षांपासून सुरू आहे. पाच वर्षांप्रू्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरातील खंडपीठासाठी ११०० कोटी रुपयांची घोषणा केली. मात्र, खंडपीठाचे कामकाज सुरू करण्याबाबत सरकारसह न्याय यंत्रणेकडूनही चालढकल सुरू असल्याने कृती समितीने पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

पहिल्या टप्प्यात मंगळवारी जिल्ह्यातील सर्व वकील न्यायालय कामकाजापासून अलिप्त राहिले. सकाळी अकरा वाजता सर्व वकील न्यायसंकुलासमोर एकत्र आले. खंडपीठाच्या प्रश्नाकडे सरकार आणि न्याययंत्रणेचे लक्ष वेधून घेण्यासाठी निदर्शने करण्यात आली.

वकिलांच्या आंदोलनामुळे ६५ न्यायालयांतील सुमारे ६५०० खटले प्रलंबित राहिल्याचा दावा करण्यात आला.

‘कोल्हापूरला खंडपीठ व्हावे यासाठी ३० वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. कोल्हापूरकरांच्या अस्मितेचा हा प्रश्न बनला आहे. आता यश जवळ आले असून जनतेच्या ताकदीवर खंडपीठ मिळवू, असा ठाम विश्वास ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांनी व्यक्त केला.

पहिल्या टप्प्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लवकरच भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी आमदार चंद्रकांत जाधव,  जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. रणजित गावडे, ज्येष्ठ वकील डी. बी. भोसले, प्रसाद जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.

First Published on February 5, 2020 2:35 am

Web Title: advocate dharna in kolhapur to demand bench zws 70
Next Stories
1 Budget 2020 : ‘टेक्निकल टेक्स्टाईल’ला प्रोत्साहन; पण सामान्य यंत्रमागधारकांची निराशा
2 कोल्हापूर महापालिकेने जयप्रभा स्टुडिओ ताब्यात घेण्याची मागणी
3 राजकीय वादातून गोळीबार करून खून, जन्मठेपेची शिक्षा
Just Now!
X