09 July 2020

News Flash

कारसेवा, वीट संकलन आणि प्रत्यक्ष अयोध्या वारी..!

निकालानंतर कोल्हापुरातील कारसेवकांकडून आठवणींना उजाळा

(संग्रहित छायाचित्र)

दयानंद लिपारे

अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या आणि गेले कित्येक वर्षे प्रलंबित असणारा अयोध्या राम मंदिर जमीन मालकीचा निकाल शनिवारी सर्वोच्च न्यायालयाकडून जाहीर करण्यात आला. या निर्णयाचे स्वागत करीत असताना राम मंदिर उभारणीसाठी थेट अयोध्येत जाऊ न प्रयत्नांची पराकाष्ठा करणारम्य़ा मोहिमेत समाविष्ट असलेले कोल्हापुरातील शंकराचार्य यांच्यापासून ते कारसेवकांना आज विशेष आनंद झाला. १९९१ सालची कारसेवा, राम मंदिर उभारणीसाठी वीट संकलन, १९९२ सालची दुसरी फलदायी ठरलेली कारसेवा, त्यातून झालेली कारवाई, मारहाणीत झालेले जखमी अशा अनेक घटनांचा पट आज या कारसेवेत सहभागी झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यतील हजारभर हिंदुत्ववाद्यांच्या बोलण्यातून आणि आनंददायी प्रतिRियांतून उलगडत गेला.

३० वर्षांंच्या कष्टप्रद प्रयत्नांना यश आल्याचा आनंद व्यक्त करताना अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी देहत्याग केलेल्या कारसेवकांना ही आदरांजली असल्याचे कारसेवक बजरंग दलाचे जिल्हा संघटक व शहर संघटक संभाजी तथा बंडा साळुंखे यांनी नमूद केले.

अयोध्या येथे वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारणी करण्याचे स्वप्न हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांंनी पाहिले होते. त्यासाठी गावोगावच्या कार्यकर्त्यांंनी यथाशक्ती प्रयत्न केले होते. कोल्हापूर जिल्ह्यतूनही या कार्याला मोठी चालना मिळाली. १९९१ साली कोल्हापुरातून कारसेवकांची सुमारे १५० दुचाकींचा समावेश असलेली रॅली अयोध्या येथे गेली होती. त्यामध्ये विद्यमान रा.स्व.संघाचे जिल्हा संघचालक भगतराम छाबडा यांचा समावेश होता. यानंतर राम मंदिर उभारणीसाठी वीट संकलनाचा उपRम राबवण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यतून अडीच ट्रक भरतील इतक्या विटा पूजन करून अयोध्येला पाठवण्यात आल्या.

मंदिर उभारणीसाठी यज्ञ

१९९२ साली दुसरी कारसेवा करतेवेळी व्यापक नियोजन केले होते. तत्कालीन विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा अध्यक्ष माधवराव साळुंखे, दिलीप भिवटे, पी. एस. कुलकर्णी आदींनी सर्वत्र फिरून जनजागृती केली. जिल्ह्यतील कोल्हापूर, इचलकरंजी, जयसिंगपूर अशा शहरी भागासह शिये ,भुये, कळे, भोगावती आदी ग्रामीण भागातील कारसेवक दुसऱ्या वेळी रेल्वेने अयोध्येला गेले. वेगवेगळे गट करून ते प्रवास करीत होते. त्यातील काहींना सांगली जिल्ह्यत रोखले. बहुतेक जण पुढे गेले होते. पण अयोध्या जवळ असलेल्या माणिकपूर येथे अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यातूनही दिलीप भिवटेसह २०-२५ कारसेवक अयोध्येकडे रवाना झाले. इकडे, पोलिसांच्या ताब्यात असलेल्या कारसेवकांनी ग्रामस्थांकडून समिधा गोळा करून यज्ञ आरंभला.

घटनाक्रमाचे साक्षीदार

इचलकरंजी येथील विश्व हिंदू परिषदेचे कारसेवकही अयोध्येत गेले होते. हा अनुभव कथन करताना विहिंपचे पश्चिम महाराष्ट्र माजी अध्यक्ष जवाहर छाबडा यांनी सांगितले,की अयोध्येत विहिंप नेते अधिक सिंघल, लालकृष्ण अडवाणी, उमाभारती, प्रमोद महाजन प्रभृती मार्गदर्शन करीत असताना अनेक कारसेवकांनी बाबरी मशिदीच्या दिशेने धाव घेतली. काही जण तयारीने आले होते. त्यांनी छन्नी- हातोडय़ाचे घाव घालून घुमट पाडण्याचा प्रयत्न केला. तो भाग कठीण असल्याने खाली भिंतीवर घाव घातले. अखेर घुमट कोसळल्यावर ‘जय श्रीराम’चा जयघोष करीत कारसेवकांनी आनंद व्यक्त केला. याचवेळी शरयू नदीतील वाळू आणून प्रतीकात्मकरीत्या राम मंदिर बांधणीचा प्रारंभ करण्यात आला, असे छाबडा यांनी सांगितले.

करवीर शंकराचार्य आणि काँग्रेस नेते

‘राम मंदिर उभारणीसाठी देशातील मुनी, महाराज, साधू यांना जोडण्याची गरज अशोक सिंघल यांना भासत होती. त्यांनी हे काम तत्कालीन करवीर पीठाचे शंकराचार्य विद्याशंकर भारती यांच्याकडे सोपवली होती. त्यांनी ती नेटकेपणाने पार पाडताना देशभर भ्रमण केले. बाबरी मशिदीचा ढाचा त्यांच्या डोळ्यादेखत पडला,’ अशी माहिती पीठाचे श्री स्वामी विद्यानृसिंह भारती स्वामी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. शंकराचार्य अयोध्येला गेले तेव्हा मोटारीचे चालकत्व कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्याकडील चालक गोविंद कुलकर्णी यांनी केले होते, अशी आठवणही त्यांनी कथन केली. तर, अयोध्यात ढाचा पडल्यानंतर रंकाळा बस स्थानक येथे संकल्पित राम मंदिर उभारणीचा भव्य फलक उभारण्यात आला होता. त्याचे उद्घाटन तत्कालीन महापौर रामभाऊ  फाळके यांनी केल्यावर त्यांना काँग्रेसच्या नेत्यांनी जाब विचारला, त्यावर त्यांनी आपण एक हिंदू या नात्याने हे काम केल्याचे उत्तर दिले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2019 1:50 am

Web Title: after the result memories of the carsevak of kolhapur lit up abn 97
Next Stories
1 कोल्हापुरातील बडय़ा नेत्यांना विधानसभा निवडणुकीत राजकीय बळ
2 सत्तासंघर्षांने राज्यातील ऊस हंगाम धोक्यात
3 अयोध्या निर्णयाचे स्वागत करत सामाजिक सलोखा कायम ठेवू
Just Now!
X