News Flash

कोल्हापूर जि. प. मधील शिवसेनेचे तिन्ही सभापती राजीनामा देणार 

कोल्हापूर जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांची आघाडी आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे सभापती २ जून रोजी राजीनामा देणार आहेत, अशी माहिती संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी दिली. यामुळे शिवसेनेतील इच्छुक सभापतींच्या हालचालींना गती आली आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांची आघाडी आहे. पदाधिकारी बदलाची चर्चा जिल्हा परिषदेत गतीने सुरू आहे. आधी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावेत, अशी भूमिका राष्ट्रवादीचे नेते, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली होती. यामुळे शिवसेनेतील इच्छुकांनी तीन सभापतींनी राजीनामा द्यावा यासाठी दबाव वाढवायला सुरुवात केली होती.

शिवसेनेतील सावळागोंधळ 

या संदर्भात दुधवडकर यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रमुख यांची बैठक झाली. बैठकीस राजीनामा देणाऱ्या सभापतींच्या नेत्यांनी दांडी मारली.

तर इच्छुक पदाधिकाऱ्यांचे नेते वेळे पूर्वीच हजर राहिले. ही बेशिस्त पाहून दुधवडकर यांचा पारा चढला. त्यांनी, इतक्या दूरवरून मी येथे आलो असताना अनुपस्थित कसे राहता, असा खडा सवाल संबंधितांना दूरध्वनीवरून करत खडसावले. अखेर २ जून रोजी बांधकाम सभापती हंबीराव पाटील, शिक्षण सभापती प्रवीण यादव, समाज कल्याण सभापती स्वाती सासणे यांचे राजीनामे घेतले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या निमित्ताने शिवसेनेतील सावळागोंधळ चर्चेत आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2021 12:16 am

Web Title: all three shiv sena chairpersons will resign from kolhapur district council zws 70
Next Stories
1 मराठा आंदोलनात भाजप सक्रिय सहभागी होणार – चंद्रकांत पाटील
2 शिवसेनेचे माथेरानमधील १० नगरसेवक भाजपमध्ये
3 आशानिराशेच्या हिंदोळ्यांवर वस्त्रोद्योग
Just Now!
X