गोिवद पानसरे हत्याप्रकरण

ज्येष्ठ नेते गोिवद पानसरे यांच्या हत्याप्रकरणी अटकेत असलेला संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड याच्या विरोधात न्यायालयात सादर केलेल्या दोषारोपत्रामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, कट रचणे आदी गंभीर कलमे दाखल आहेत. त्यामुळे दाखल केलेली कलमे मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी माहिती पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी दिली.

narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
challenge to the forest officials to find the tigress dropped radio collar
नागपूर : ‘रेडिओ कॉलर’ निघाली; ‘त्या’ वाघिणीचा शोध घेण्याचे वनाधिकाऱ्यांपुढे आव्हान
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
Crime against four for polluting Pavana river
पिंपरी : पवना नदी प्रदूषित करणाऱ्या चौघांवर गुन्हा

पानसरे यांच्या हत्येप्रकरणी गायकवाड याच्यावर पोलिसांनी १४ डिसेंबर २०१५ रोजी न्यायालयात गायकवाडवर ३९२ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले. त्यानुसार २० मे रोजी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले हे दोषारोप निश्चित करण्याची शक्यता आहे. पानसरे हत्या प्रकरणातील पुरवणी तपासाचा अहवाल पोलिसांनी यापूर्वी न्यायालयात सादर केला आहे. दोषारोपपत्रामधून कोणतेही कलम वगळण्यात आलेले नाही. पोलिसांनी केलेल्या तपासाचा अहवाल न्यायालयासमोर आहे. त्यावरून न्यायालय दोषारोप निश्चित करील, असे देशपांडे यांनी या वेळी सांगितले.