‘आमचं ठरलंय’  आता महापोर्टलचे संकट दूर करणार, अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी रविवारी येथे दिली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडील रिक्त पदे लवकर भरण्यात यावीत. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मागणी करणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

सतेज पाटील फौंडेशन यांच्या सहयोगाने आणि राजाराम महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमान स्पर्धा परीक्षा देणारम्य़ा विद्यार्थ्यांंसाठी मार्गदर्शनपर १० वे स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. महापालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी, राजाराम महाविद्यालयाचे प्राचार्य अण्णासाहेब खेमणार, डॉ. आनंद पाटील उपस्थित होते.

State Tax Inspector Exam Final Result declared by MPSC
राज्य कर निरीक्षक परीक्षेचा अंतिम निकाल एमपीएससीकडून जाहीर
MPSC Announces General Merit List, Police Sub Inspector Cadre , Relief to Candidates, mpsc announced merit list, mpsc, maharashtra news, government exam, police, police officer, marathi news, students, MPSC
एमपीएससीकडून २०२१च्या ‘पीएसआय’ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर
Postponement of physical test of PSI by MPSC Pune print news
एमपीएससीकडून ‘पीएसआय’ची शारीरिक चाचणी लांबणीवर
mpsc MPSC declared the result of Civil Engineering Pune
एमपीएससीकडून ‘स्थापत्य अभियांत्रिकी’चा निकाल जाहीर

अध्यक्षस्थानी विशेष पोलीस निरीक्षक कृष्णप्रकाश होते. त्यांनी ‘कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी ध्येयनिश्चिती, प्रबळ इच्छाशक्ती, सकारात्मक ऊ र्जा आणि दृष्टिकोन याची आवश्यकता असते. स्पर्धा परीक्षा आणि इतर आव्हानात्मक परीक्षांमध्ये सातत्य आणि सराव या गोष्टींना महत्त्व आहे. युवकांनी आपल्यातील सकारात्मक ऊ र्जा ओळखून ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करावेत असा सल्ला विद्यार्थ्यांंना दिला. संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार पाटील यांनी राजकारण आणि प्रशासकीय सेवा याची तुलना केली. ते म्हणाले,की  राजकारण आणि सनदी अधिकारी या दोन्ही बाजू वेगळ्या आहेत. दर पाच वर्षांंनी राजकारण्यांना उत्तीर्ण होण्यासाठी जनतेच्या मतांची परीक्षा द्यावी लागते. मात्र, एक वेळ सनदी वा प्रशासकीय अधिकारी झाला की, त्याला आयुष्यभर प्रामाणिकपणे काम करण्याची जबाबदारी त्याच्यावर पडते. राज्य लोकसेवा आयोगा कडील रिक्त पदांबाबतही त्यांनी चिंता व्यक्त करीत लवकरच या संदर्भात आपण मुख्यमंत्री ठाकरे यांना भेटणार असल्याचे सांगितले.