18 March 2019

News Flash

मुलींचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकास चोप

कांबळे विरुद्ध यापूर्वीही वर्गातील मुलींचा विनयभंग करत असल्याच्या तक्रारी  आल्या होत्या.

प्रातिनिधीक छायाचित्र

कोल्हापूर : प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या  मुलींचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला पालक व ग्रामस्थांनी बेदम चोप देण्याची घटना शुक्रवारी घडली. कागल तालुक्यातील बोळावी येथे हा प्रकार करणाऱ्या सुनील भाऊ  कांबळे (रा. बिद्री)  या शिक्षकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मुरगूड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

बोळावी येथील विद्यामंदिर प्राथमिक शाळेत सेवेत असणारा कांबळे विरुद्ध यापूर्वीही वर्गातील मुलींचा विनयभंग करत असल्याच्या तक्रारी  आल्या होत्या.काही मुलींनी याबाबत मुख्याध्यापकांना याची कल्पना दिली होती. मुख्याध्यापकांनी कांबळे यांची याबाबत कानउघडणी देखील केलेली होती.  मात्र याचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. त्रस्त विद्यार्थिनींनी पालकांना याची माहिती दिली. त्यामुळे बोळावीसह आजूबाजूच्या गावातील दोनशेवर पालक आज शाळेत आले. त्यांनी कांबळे याला जाब विचारला तर काहींनी त्याची धुलाई केली. काहींनी याची माहिती मुरगूड पोलिसांना दिली. पालकांनी कांबळे याला पोलिसांच्या ताब्यात दिले.  मुरगूड पोलिसांनी सुनील कांबळे यांच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

First Published on November 3, 2018 5:50 am

Web Title: angry locals thrash school teacher for molestation of girls