12 August 2020

News Flash

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या ग्रंथ पुरस्कारांची घोषणा

सन २०१९ मधील ग्रंथ पुरस्कारांची घोषणा

कोल्हापूर : डॉ. अरुण शिंदे, डॉ. सतीशकुमार पाटील, डॉ. सुप्रिया आवारे, वासंती मेरु, चंद्रशेखर कांबळे आणि बजरंग दत्तू या साहित्यिकांना दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे ग्रंथ पुरस्कार जाहीर झाले आहेत.

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने सन २०१९ मधील ग्रंथ पुरस्काराची घोषणा शनिवारी करण्यात आली. पुरस्कारासाठी वासंती मेरु, डॉ. अरुण शिंदे, डॉ. सुप्रिया आवारे, चंद्रशेखर कांबळे यांची निवड करण्यात आली आहे.

  • पुरस्कार प्राप्त पुस्तकं आणि लेखक :

देवदत्त पाटील पुरस्कार – मृत्यूस्पर्श – डॉ. सतीश कुमार पाटील (कादंबरी), शंकर खंडू पाटील पुरस्कार – सत्यवादी – बजरंग दत्तू (कथासंग्रह), अण्णा भाऊ साठे पुरस्कार – उद्ध्वस्त मनाचा गाभारा – वासंती मेरु (सामाजिक), कृ. गो. सूर्यवंशी पुरस्कार- सत्यशोधकीय नियतकालिके – डॉ. अरुण शिंदे (संकीर्ण), चैतन्य माने पुरस्कार (प्रथम प्रकाशन) – न बांधल्या जाणाऱ्या घरात – डॉ. सुप्रिया आवारे (कवितासंग्रह), शैला सायनाकर पुरस्कार – शेणाला गेलेल्या पोरी – चंद्रशेखर कांबळे (कवितासंग्रह) आणि बालवाड्मय पुरस्कार – बार्बी डॉल – वर्षा चौगुले.

  • विशेष पुरस्काराचे मानकरी :

सखा कलाल पुरस्कार – फास (बाळासाहेब पाटील), अनुराधा गुरव पुरस्कार – अरुणोदय (स्वाती शिंदे-पवार).

  • इतर पुरस्कारांचे मानकरी :

सूर्य गोंदला भाळी (जगजित महावंश), त्यांचे जिणे (मंगेश मंत्री), कोणत्याही शक्यतेच्या पलिकडे (लवकुमार मुळे), वारणेची लेकरं (विठ्ठल सदामते), सावज (सुनील देसाई), गंध सोनचाफी (गौतम कांबळे), निर्भय (उमेश सूर्यवंशी), भारतीय संविधान आणि लोक (विश्वास सुतार).

परीक्षक म्हणून कादंबरीकार नामदेव माळी, समीक्षक डॉ. जी. पी. माळी, कवी गोविंद पाटील, दयासागर बन्ने यांनी काम पाहिले. कोविडची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर जाहीर कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल, असे दमसाचे कार्याध्यक्ष प्रा. वि. द. कदम आणि सहकार्यवाह डॉ. विनोद कांबळे यांनी कळवले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2020 6:00 pm

Web Title: announcement of dakshin maharashtra sahitya sabha granth puraskar aau 85
टॅग Coronavirus
Next Stories
1 प्रमाणित मुखपट्टींशी नामसाधर्म्य ठेवत बनवेगिरीचा सुळसुळाट
2 कोल्हापुरात ३४ नवे बाधित; इचलकरंजीत टाळेबंदीला हरताळ
3 टाळेबंदीवरून कोल्हापूरमध्ये विसंवाद
Just Now!
X