News Flash

‘गोकुळ’च्या आणखी एका ठरावधारकाचा करोनाने मृत्यू

गेल्या चारपाच दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती.

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या आणखी एका ठरावधारकाचा करोनामुळे बुधवारी मृत्यू झाला. यापूर्वी शाहूवाडी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेतील शाखा व्यवस्थापक असलेल्या एका ठरावधारकाचा यामुळेच मृत्यू झाला होता.

शिरोळ तालुक्यातील बुबनाळ येथील दूध संघाच्या ठरावधारकाची प्रकृती बिघडल्याने त्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा करोना अहवाल सकारात्मक आला होता. यानंतर त्यांना जयसिंगपूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. गेल्या चारपाच दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती.

मंगळवारी मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला. बुधवारी अंकली उदगाव येथील कृष्णा नदीकाठच्या स्मशानभूमीत शासकीय कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले.

न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष

दरम्यान, करोना संसर्ग वाढत असल्याने गोकुळ दूध संघाची निवडणूक पुढे घेण्यात यावी अशी याचिका सत्तारूढ गटाच्या एका दूध संघाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. न्यायालयाने २६ एप्रिल रोजी राज्य शासनाला म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत. करोनामुळे दोघा ठरावधारकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे याबाबत आता न्यायालय कोणता निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे. दोन्ही आघाडय़ांनी उमेदवारांची घोषणा करून प्रचाराला सुरुवात केली असताना न्यायालयाचा निकाल महत्त्वाचा ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2021 12:13 am

Web Title: another gokul dudh sangh election resolution holder dies by corona zws 70
Next Stories
1 सत्तारूढ आघाडीला विरोधकांचे जबर आव्हान
2 हसन मुश्रीफ यांची देवेंद्र फडणविसांवर टीका
3 रेमडेसिविर, कृत्रिम प्राणवायू, खाटांचे कोल्हापुरात योग्य नियोजन – यड्रावकर
Just Now!
X