News Flash

अफझलखान कबर अनधिकृत बांधकामाविरुद्ध आंदोलन – नितीन शिंदे

यंदा प्रतापगडावर शिवप्रताप दिन १८ डिसेंबरला साजरा करण्यात येणार आहे

| December 9, 2015 03:32 am

प्रतापगड येथे साजऱ्या होणाऱ्या शिवप्रताप दिनाच्या प्रशासनाने १७ ते २० डिसेंबर या कालावधीसाठी सातारा जिल्हा बंदी हुकूम बजावला असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आ. नितीन शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या अफझलखान कबर आणि अनाधिकृत बांधकामाबाबत आंदोलन हाती घेतले आहे. यामुळेच आपणास ही बंदी लागू करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
यंदा प्रतापगडावर शिवप्रताप दिन १८ डिसेंबरला साजरा करण्यात येणार आहे.  हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने २००३ पर्यंत या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत होते. मात्र अनधिकृत बांधकामाबाबत आंदोलन सुरू झाल्यानंतर २००४ पासून राज्य शासनाच्या वतीने या ठिकाणी शिवप्रतापदिन साजरा करण्यात येत आहे. या आंदोलनाचे नेतृत्व केले असल्यामुळेच साताऱ्याचे अपर जिल्हादंडाधिकारी संजीव देशमुख यांनी जिल्हा बंदी हुकूम बजावला असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2015 3:32 am

Web Title: aphajhalakhana tomb unauthorized construction movement nitin shinde
टॅग : Construction,Movement
Next Stories
1 मध्ययुगामध्ये स्त्रीवर्गाने दाखवलेले धैर्य विलक्षण – डॉ. अरूणा ढेरे
2 नारळीकर दाम्पत्यास दाभोलकर पुरस्कार
3 स्वतंत्र विदर्भाच्या विधानावरून कोल्हापुरात शिवसेनेची निदर्शने