07 March 2021

News Flash

कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या अश्विनी रामाणे, उपमहापौरपदी शमा मुल्ला

भाजपच्या उमेदवार सविता भालकर यांचा ११ मतांनी पराभव

महापौरपदाच्या निवडणुकीनंतर काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यासोबत महापौर अश्विनी रामाणे आणि उपमहापौर शमा मुल्ला.

कोल्हापूरच्या महापौरपदी सोमवारी काँग्रेसच्या नगरसेविका अश्विनी अमर रामाणे यांची निवड झाली. त्यांनी भाजपच्या उमेदवार सविता भालकर यांचा ११ मतांनी पराभव केला. कोल्हापूरमध्ये महापौरपद मिळवण्याचे भाजप आणि ताराराणी आघाडीचे स्वप्न अखेर सोमवारी भंगले. उपमहापौरपदी राष्ट्रवादीच्या शमा मुल्ला यांची निवड झाली.
महापौरपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मतदान घेण्यात आले. एकूण ७७ सदस्य मतदानासाठी उपस्थित होते. अश्विनी रामाणे यांना ४४ तर सविता भालकर यांना ३३ मते पडली. शिवसेनेचे चार नगरसेवक मतदानावेळी अनुपस्थित राहिले होते. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत कोल्हापुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उद्याला आला होता. मतमोजणीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी केली. मात्र, सुरुवातीला भाजपनेही महापौरपदासाठी सर्व पर्यायांची चाचपणी करण्याचा जाहीर केले होते. त्यामुळे काँग्रेस की भाजप कोणाचा महापौर निवडून येतो, याकडे कोल्हापूरवासियांचे लक्ष लागले होते. अखेर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी आघाडीतील चर्चेप्रमाणे काँग्रेसच्या उमेदवाराला महापौरपदी निवडून दिले. उपमहापौरपदी निवडून आलेल्या शमा मुल्ला यांनाही निवडणुकीत ४४ मते पडली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2015 12:14 pm

Web Title: ashwini ramane elected as mayor of kolhapur municipal corporation
टॅग : Congress
Next Stories
1 करवीरनगरीत आज महापौर निवड
2 अध्यात्म, चमत्कार शब्दांमुळे संभ्रमित
3 ज्येष्ठ नागरिकांच्या धोरणासाठी शासन बांधील – चंद्रकांत पाटील
Just Now!
X