कोल्हापुरात ३ नगरपालिका भाजपाकडे

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात भाजपाने घवघवीत यश मिळवता मित्रपक्षासह इचलकरंजी, जयसिंगपूर व मलकापूर येथे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून आणला. निकराची लढत देत लक्षवेधी कागलचा गड आमदार हसन मुश्रीफ यांनी कसाबसा राखला. जनता दलाचे अस्तिव पुन्हा एकदा गडिहग्लज पालिकेत दिसून आले. पन्हाळ्यात जनसुराज्य, मुरगूडमध्ये शिवसेना, वडगावमध्ये युवक क्रांती महाआघाडी यांना धवल यश मिळले. इचलकरंजी, जयसिंगपूर येथे काँग्रेस-राष्ट्रवादीचे बहुमत झाल्याने गड आला पण सिंह गेला अशी स्थिती निर्माण झाली. कुरुंदवाड पालिका जिंकत काँग्रेस पक्षाने आपले अस्तिव दाखवून दिले.

lok sabha elections 2024 udayanraje bhosale declared bjp candidate from satara
साताऱ्याची जागा भाजपने बळकावली; राष्ट्रवादीला धक्का; ठाणे, रत्नागिरी, नाशिकचा तिढा कायम
Prithviraj Chauhan
भिवंडीच्या बदल्यात सातारा काँग्रेसला? पृथ्वीराज चव्हाण यांना लढण्यासाठी आग्रह
Sangli Friendly fight will be decided by congress in Delhi tomorrow
सांगलीतील मैत्रीपूर्ण लढतीचा उद्या दिल्लीत निर्णय
balasaheb thorat
सांगली, भिवंडीच्या जागेवरून काँग्रेसचा दोन्ही पक्षांशी संघर्ष? शरद पवारांच्या भेटीनंतर बाळासाहेब थोरात म्हणाले…

जनता दलाने गड राखला

गडिहग्लज नगरपालिकेच्या चुरशीच्या निवडणुकीत एक नेता एक चिन्ह आणि एक पक्ष अशा जनता दलाने गड राखला असून विद्यमान आ. हसन मुश्रीफ याच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसला आहे. तर भाजपा-शिवसेना युतीचा नगरपालिकेतील प्रवेश मुश्रीफांच्या राजकारणाला धक्का देणारा ठरला आहे. नगराध्यक्षपदी जनता दलाच्या प्रा. स्वाती कोरी शिंदे यांनी १८०० मताधिक्य मिळवून थेट नराध्यक्ष निवडीचा मान मिळवला आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे रमेश िरगणे व भाजपाचे वसंत यमगेकर यांचा पराभव केला. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे कारभारी नगरसेवक किरण कदम व रामदास कुराडे यांना जनतेने नाकारले आहे.

गडिहग्लज नगरपालिका निवडणुकीत जनता दलाला दहा, राष्ट्रवादीला चार तर नव्याने बांधणी झालेल्या भाजपा-शिवसेना युतीला तीन जागा मिळाल्या. या निवडणुकीत सहा विद्यमान नगरसेवकांना प्रवेश मिळाला. रामदास कुराडे, अरुणा िशदे, सरिता बसकर या विद्यमान नगरसेवकांना पराभवाचा फटका बसला. नगराध्यक्षपदासाठी जनता दल नेते अ‍ॅड. श्रीपतराव िशदे यांच्या कन्या प्रा. स्वाती कोरी िशदे यांना ७८१७ मते, राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश िरगणे यांना ६००० तर भाजपा-सेना युतीचे वसंत यमगेकर याना ३६३७ मते मिळाली.

जनता दलाच्या नगराध्यक्ष पदाच्या विजयी उमेदवार प्रा. स्वाती कोरी म्हणाल्या, हा विजय आम्ही केलेल्या विकासाचा व जनता दल कार्यकर्त्यांच्या एकसंधतेचा आहे. सुज्ञ मतदारांनी जनता दल आणि श्रीपतराव िशदे यांच्यावर दाखविलेला विश्वास आम्ही सार्थ ठरवू.

कागल मुश्रीफांकडे

थेट नगराध्यक्षपदाच्या अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादी पक्षाच्या माणिक रमेश माळी या १०६ मतांनी विजयी झाल्या. त्यांना ९१०९ मते मिळाली. त्यांच्या नजीकच्या प्रतिस्पर्धी भाजपाच्या निशा राजेंद्र रेळेकर यांना ९००३ मते मिळाली. या निवडणुकीत २० जागांपकी राष्ट्रवादी शिवसेना अपक्ष आघाडीने ११ व भाजपाने ९ जागा जिंकल्या. आघाडीच्या विजयी उमेदवारांमध्ये राष्ट्रवादीच्या ८, शिवसेनेच्या २ व एक अपक्ष उमेदवाराचा समावेश आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक आशा माने व संजय चितारी, तसेच माजी नगराध्यक्ष अशोक जकाते पराभूत झाले.

पक्षीय पातळीवर सर्वाधिक ९ जागा जिंकून भाजपाने पालिकेत मुसंडी मारली आणि नवख्या समरजितसिंह घाटगे यांनी राजकारणाच्या पदार्पणातच प्रबळ हसन मुश्रीफ यांच्यासमोर आव्हान निर्माण केले. भाजपाच्या बहुतांश उमेदवारांचा निसटता पराभव झाला. घाटगे यांच्या झुंजीने मुश्रीफांची दमछाक झाली. राष्ट्रवादीच्या माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका आशा माने, माजी नगराध्यक्ष अशोक जकाते व विद्यमान नगरसेवक संजय चितारी हे भाजपाच्या नवख्याउमेदवारांकडून पराभूत झाले. कागल नगरपालिकेवरील आपली पकड अबाधित ठेवताना राष्ट्रवादीचे नेते व आमदार हसन मुश्रीम यांना निकराचे प्रयत्न करावे लागले. त्यांचा राजकीय मुरब्बीपणा पुन्हा एकादा कामी आला.

मुरगूडवर शिवसेनेचा वरचष्मा

मुरगूड नगर पालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने नगराध्यक्षासह बारा जागा जिंकून मुरगूड मंडलिकांचा बालेकिल्ला असल्याचा कौल जनतेने दिला. राष्ट्रवादी काँग्रेसने दोन, अपक्ष दोन, तर शिवाजी महाराज कागल तालुका विकास आघाडीचा केवळ एकच नरगरसेवक निवडून आला. सत्ताधारी मुश्रीफ गट, तसेच भाजप आणि मुरगुडकर पाटील यांना मतदारांनी थेट नाकारले. नगराध्यक्ष पदाचे सेनेचे उमेदवार राजेखान कादरखान जमादार, ४८६१ हे त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी शिवाजी महाराज कागल तालुका विकास आघाडीचे उमेदवार व माजी उपनगराध्यक्ष संतोष वंडकर यांच्यापेक्षा १८७७ मतांचे मताधिक्य घेऊन विजयी झाले.

मुरगूड नगरपालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपाचे अकरा उमेदवार उतरले होते. मात्र एकमेव सत्यजित अविनाश पाटील वगळता सर्वच्या सर्व म्हणजे दहा उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली असून, त्यात माजी उपनगराध्यक्ष अनंत फर्नाडिस यांचाही समावेश आहे.

दोन भावांना पराभवाचा धक्का.

मुरगूडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील व त्यांचे सख्खे भाउ अजितसिंह पाटील हे दोघे या निवडणुकीत नशीब आजमावत होते. मात्र मतदारांनी त्यांना पराभूत करून पाटील बंधूंचे नेतृत्व झिडकारल्याचे दाखवून दिले आहे.

वडगावमध्ये स्थानिक आघाडीचे प्राबल्य

वडगाव पालिका निवडणुकीच्या तिरंगी लढतीत युवक क्रांती महाआघाडीने १३ जागांवर निर्विवाद विजय मिळवत सत्ताधारी यादव आघाडीला धक्का दिला. यादव पॅनेलला चार जागा मिळाल्या तर भाजपा-जनसुराज्य,आरपीआयला एकही जागा न मिळाल्याने भाजपाचा करिष्मा या निवडणुकीत चालला नाही. वडगाव पालिका निवडणुकीत विरोधी युवक क्रांती-महाआघाडीने तेरा जागांवर निर्वविाद विजय मिळविला. सत्ताधारी यादव पॅनेलला चारच जागांवर समाधान मानावे लागले तर भाजपा-जनसुराज्य-आरपीआयला एकही जागा न मिळाल्याने केंद्र व राज्यात सत्ता असलेल्या भाजपाचा करिष्मा या निवडणुकीत चालला नाही.

थेट नगराध्यक्षपदासाठी झालेल्या तिरंगी लढतीत युवक क्रांती महाआघाडीतून मोहनलाल रामलाल माळी यांनी ७३४१ मते मिळवून १०३२ मतांची आघाडी घेऊन विजयी झाले. सत्ताधारी यादव गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजन नेमिनाथ शेटे  यांना ६३०९ अशी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. तर भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ.अशोक आण्णासो चौगुले यांना ३७४७ मते मिळून पराभव स्वीकारावा लागला.

 इचलकरंजी, जयसिंगपूरमध्ये गड आला..

जिल्ह्यातील सर्वात मोठी इचलकरंजी आणि दुसऱ्या क्रमांकाची जयसिंगपूर या दोन्ही पालिकेत गड आला, पण सिंह गेला अशी अवस्था निर्माण झाली. इचलकरंजीमध्ये भाजपच्या अ‍ॅड. अलका अशोक स्वामी या सुमारे ३८ हजारांच्या मोठ्या फरकाने विजयी होत नगराध्यक्षा बनल्या. तर ताराराणी आघाडीच्या डॉ. नीता माने या जयसिंगपूरच्या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या. या आघाडीत भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचा समावेश होता. तर, प्रतिस्पर्धी शाहू आघाडीत राष्ट्रवादी, काँग्रेस यांचा समावेश होता. तथापि, या दोन्ही पालिकेत नगराध्यक्ष एकाचा आणि बहुमत दुसऱ्याचे असे विसंगत चित्र निर्माण झाले आहे.

इचलकरंजीत सुरुवातीपासूनच स्वामी यांना अनुकूल वातावरण होते, निकालाने त्यावर शिक्कामोर्तब केले. त्यामानाने काँग्रेसचे रवी रजपुते हे खूपच मागे फेकले गेले. एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी होत असताना स्वामी यांचे मताधिक्य वाढतच चालले होते, तर या वेळी मतदारांनी रजपुते यांना जाणीवपूर्वक बाजूला फेकल्याचे निकालाने दिसले. स्वामी यांनी तब्बल ९०,६९१ मते मिळवताना भाजप आमदार सुरेश हाळवणकर यांना मिळालेल्या मताधिक्यापेक्षा दुपटीहून अधिक अधिक्य घेत जबरदस्त विजयाची नोंद केली. रजपुते यांना ५२,७२७ मते मिळाली.

इचलकरंजीतील संख्याबळ

एकूण ६२ जागा. भाजपा-१४, ताराराणी आघाडी-११, शिवसेना-१, काँग्रेस-१८, राष्ट्रवादी काँग्रेस-७ , शाहू आघाडी-९, अपक्ष-०२

जयसिंगपुरात सत्तासंभ्रम

नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत जनतेने नगराध्यक्षपद माजी आमदार महादेवराव महाडीक यांच्या नेतृत्वाखालील ताराराणी आघाडीच्या हाती दिले. मात्र शरद साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यड्रावकर आणि श्री दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू आघाडीच्या १३ नगरसेवक निवडून आल्याने जनतेने बहुमत मात्र शाहू आघाडीकडे सोपवले.

नगराध्यक्ष पदासाठी स्न्ोहा िशदे या राजर्षी शाहू आघाडीकडून तर डॉ. नीता माने या ताराराणी आघाडीकडून िरगणात होत्या. शिवाय अपक्ष पाच उमेदवार होते. खरी लढत मात्र िशदे आणि माने यांच्यातच झाली हे निकालावरून स्पष्ट झाले. डॉ. नीता माने यांनी १४६९५ मते घेत स्न्ोहा िशदे यांना १११८ मतांनी पराभूत केले.

कुरुंदवाड त्रिशंकू

कुरुंदवाड पालिकेच्या निवडणुकीत त्रिशंकू अवस्था निर्माण झाली. काँग्रेसचे उमेदवार जयराम पाटील हे १४५ मतांनी विजयी झाले. येथे भाजप व काँग्रेस पक्षाला प्रत्येकी ६ जागा मिळाल्या, तर राष्ट्रवादीला ५ जागा मिळाल्या. आमदार सतेज पाटील समर्थक जयराम पाटील यांना ५९७६ तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे रामचंद्र डांगे यांना ५९७९ आणि राष्ट्रवादीचे रावसाहेब पाटील यांना ३७८३ मते मिळाली.

मलकापूरमध्ये कमळ फुलले

मलकापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजप-जनसुराज्य, करणसिंह गायकवाड व राष्ट्रीय दलित महासंघाच्या आघाडीने नगराध्यक्षपदासह ९ जागा जिंकून मलकापूर नगरपरिषदेत कमळ फुलविले. सत्तारूढ राष्ट्रवादी-शिवसेनेने आठ जागा जिंकून आपले आव्हान कायम राखले.

भाजप-जनसुराज्य पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोल केसरकर यांनी विरोधी शिवसेना-राष्ट्रवादीचे उमेदवार प्रकाश पाटील यांच्यावर आघाडी घेतली. अखेरीस केसरकर यांनी २२४५ मते घेतली तर प्रकाश पाटील यांना १७६६ मते मिळाली.

केसरकर यांनी पाटील यांचा ४७९ मतांनी पराभव केला. भाजप जनसुराज्य आघाडीने नगराध्यक्षदासह १० जागा मिळवीत नगरपालिकेवर विजयी आघाडी घेतली. तर विरोधी शिवसेना व राष्ट्रवादी मित्र पक्ष आघाडीने आठ जागा जिंकून आपली ताकद अबाधित ठेवली.

पन्हाळ्यात जनसुराज्याचा गुलाल

पन्हाळा नगरपालिकेच्या निवडणुकीत स्थानिक आघाड्यांचा धुव्वा उडवत माजी मंत्री विनय कोरे यांच्या जनसुराज्यशक्ती पक्षाने एक हाती सत्ता काबीज केली. जनसुराज्यपक्षाने नगराध्यक्षपदासह १२ तर मोकाशी शिवसेना आघाडीने ३ तर भोसले गटाने २ जागा मिळविल्या. जनसुराज्यच्या रूपाली धडेल यांनी १३५३ मते मिळवीत शाहू आघाडीच्या रजिया इम्तीयाज मोकाशी व पन्हाळा आघाडीच्या साधना स्वप्नील काशीद यांचा पराभव केला.

नगराध्यक्षपदासाठी रूपाली रवींद्र धडेल यांना १३५३, साधना स्वप्नील काशिद ३७१, रजिया इम्तीयाज मोकाशी यांना ७६६ मते मिळाली.