12 August 2020

News Flash

राज्य शासनाच्या फसव्या कर्जमाफीच्या निषेधार्थ भाजपाची कोल्हापुरात धरणे

भाजप शिष्टमंडळाच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना निवेदन देण्यात आले.

फसव्या कर्जमाफीच्या निषेधार्थ भाजपाच्या धरणे आंदोलनात धनंजय महाडिक,  राहुल चिकोडे, महेश जाधव, अजित ठाणेकर सहभागी झाले होते. (छाया - राज मकानदार)

कोल्हापूर : महाविकास आघाडीच्या फसव्या कर्जमाफी आणि महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ मंगळवारी भाजपाने कोल्हापूर जिल्ह्यात धरणे आंदोलन केले. कोल्हापूर शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येऊन सरकारचा निषेध नोंदवण्यात आला.

राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपने धरणे आंदोलन केले. फसव्या महाविकास आघाडीचा धिक्कार असो, नारी शक्तीचा घात – बळिराजाचा विश्वासघात सहन केला जाणार नाही, शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे, स्थगिती सरकार हाय-हाय अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. निषेध फलक दाखवण्यात आले.

भाजप शिष्टमंडळाच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना निवेदन देण्यात आले. प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक,पश्चिम महराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे ,सरचिटणीस अशोक देसाई यांची भाषणे झाली. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी आणि आताच्या मुख्यमंत्र्यांनी तसेच काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अवकाळीग्रस्तांना २५ हजार रुपये हेक्टरी आणि फळबागांसाठी ५० हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती. पण महाविकास आघाडी सरकारच्या प्रमुखांना आपल्या आश्वासनाचा विसर पडला असल्याची टीका त्यांनी केली.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2020 2:52 am

Web Title: bjp protest against maharashtra government in kolhapur zws 70
Next Stories
1 मराठी भाषा धोरण निश्चितीचे अहवाल शासनाच्या बासनात
2 वारणा-चांदोली प्रकल्पग्रस्तांची वेदना चार दशकानंतरही कायम
3 कर्जाच्या विळख्यात सापडलेले यंत्रमागधारक हवालदिल
Just Now!
X