News Flash

अज्ञात महिलेचा खून करून मृतदेह जाळला

उत्तर सोलापूर तालुक्यातील सेवालाल नगरात एका शेतात ४० वर्षांच्या अज्ञात महिलेचा खून करून मृतदेह जाळलेल्या अवस्थेत टाकून देण्यात आल्याची घटना उघडकीस आली.

उत्तर सोलापूर तालुक्यातील सेवालाल नगरात एका शेतात ४० वर्षांच्या अज्ञात महिलेचा खून करून मृतदेह जाळलेल्या अवस्थेत टाकून देण्यात आल्याची घटना उघडकीस आली. मृतदेहाची ओळख पटली नसून हा खून कोणी व कशासाठी केला, याचा तपास पोलीस करीत आहेत.
सेवालाल नगरात रामेश्वर शंकर कोष्टी यांच्या शेतात सकाळी साडेनऊच्या सुमारास एका अज्ञात महिलेचा खून करून मृतदेह तुराटीच्या ढिगात जाळून गुन्ह्य़ाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबाबतची फिर्यादी स्वत: शेतकरी रामेश्वर कोष्टी यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात नोंदविली आहे.
शेतजमीन हडपली
बनावट दस्तीेव व बनावट आधारकार्डाच्या आधारे तोतया मालक उभा करून शीतल गोखले यांच्या मालकीची शेतजमीन परस्पर खरेदीखत करून हडपल्याचा प्रकार मंगळवेढा येथे उघडकीस आला. या प्रकरणी सुजय तुकाराम लवटे, महादेव तुकाराम दत्तू, बंडू येडा मेटकरी, मल्हारी सुरेश चव्हाण, आकाश सिद्धेश्वर मंडले, अतुल आनंद मुरडे, शिवाजी ज्योतीराम गोबे (रा. मंगळवेढा) व अनुष शिरीष जोशी (रा. पुणे) यांच्याविरुद्ध मंगळवेढा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2016 2:30 am

Web Title: burned the bodies after murder of unknown woman
टॅग : Burned,Solapur
Next Stories
1 जलसंधारणाच्या कामांसाठी श्रमदानाचीही आमीर खान याची इच्छा
2 पंचायत समिती विस्तार अधिकाऱ्यास ५ दिवस पोलीस कोठडी
3 तृप्ती देसाई मारहाणप्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा
Just Now!
X