19 March 2019

News Flash

पक्षाने आदेश दिल्यास कोल्हापुरातून विधानसभा लढणार — चंद्रकांत पाटील

आपण पोस्टाचे कोरे पाकीट आहोत, पक्ष चिकटवेल त्या ठिकाणी पोचू, असे नमूद करत याबाबत पक्ष देईल तो आदेश पाळण्यास तत्पर असल्याचे स्पष्ट केले.

चंद्रकात पाटील (संग्रहित छायाचित्र)

विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत कमालीचे कुतूहल निर्माण करणारे  महसूल मंत्री चंद्रकात पाटील यांनी  कोल्हापूर  उत्तर विधानसभा मतदार संघातून आगामी विधानसभेची निवडणूक  लढणार असल्याचे जाहीर केले आहे . याचवेळी त्यांनी आपण पोस्टाचे कोरे पाकीट आहोत , पक्ष चिकटवेल  त्या ठिकाणी पोचू , असे नमूद करत याबाबत पक्ष देईल तो आदेश पाळण्यास तत्पर असल्याचे स्पष्ट केले.

केंद्रातील मोदी सरकारला चार वर्षे  झाल्याने सरकारच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी भाजपाच्यावतीने पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले जात आहे . कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातील भाजप बूथ प्रमुखांच्या मेळाव्यात मंत्री पाटील यांनी आपली भूमिका मांडली . मंत्री  पाटील  पुणे पदवीधर मतदारसंघातून विजयी होऊ न विधानपरिषदेत पोचले आहेत. पण  त्यांनी मागील दारातून विधिमंडळात येण्याऐवजी थेट जनतेतून निवडणूक लढवावी, अशी टीका विरोधकांकडून केली जात  आहे. त्यामुळे  पाटील यांनीच या मेळाव्याचे निमित्त साधून आपले पत्ते  खुले केले.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात भाजपकडून कोण कोण निवडणूक लढवू  शकते हे पाटील यांनी स्पष्ट केले . ते म्हणाले,  गतवेळी  पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव पक्षाकडून लढले, पण थोडक्या मताने पराभूत झाले.  काँग्रेसकडून लढलेले नगरसेवक सत्यजित कदम हे आता आमच्यासोबत आहेत . म्हणजे या दोघांसह आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील, काँग्रेसचे माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या पत्नी मधुरिमाराजे छत्रपती यांच्या नावाची चर्चा आहे. मी स्वत:  विधानसभा निवडणूक लढविणार नाही, मात्र पक्षाच्या वरिष्ठांनी आदेश दिला तर मला निवडणूक लढवावी लागेल . कोल्हापूर जिल्ह्यत  भाजप ठरवेल तोच खासदार आणि आमदार होईल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.कार्यकर्त्यांनी गाफील न राहता आगामी निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे त्यांनी आवाहन केले.

First Published on June 6, 2018 1:52 am

Web Title: chandrakant patil bjp