सतेज पाटील यांचा आरोप

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा बोलवता धनी वेगळाच आहे. आमदार हसन  मुश्रीफ व माझ्यावर पालकमंत्र्यांच्या टीकेत महाडिकांचेच बोल आहेत , असा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला. जिल्हा परिषद विषय समितीच्या निवडणुकीसाठी सावधगिरीचा उपाय म्हणून उभय काँग्रेसच्या सदस्यांना सहलीवर पाठवण्यापूर्वी येथे झालेल्या बठकीत पाटील व मुश्रीफ या दोन्ही आमदारांनी महाडिकांवर टीकास्त्र सोडले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी, जिल्’ााच्या राजकारणात असंतुष्ट असलेले आमदार हसन मुश्रीफ व सतेज पाटील म्हणजे छोट्या मनाचे मोठे उदाहरण आहेत. जिल्हा परिषदेत संख्याबळ अपुरे असतानाही त्यांनी सभापती निवडीत बाजी मारण्याची चालवलेली भाषा हेच दाखवून देत आहे ,  अशी खरमरीत टीका केली होती.

त्याला प्रत्युत्तर देताना आमदार सतेज पाटील यांनी महापालिका राजकारणाचा दाखला दिला. ते म्हणाले, की महापालिकेत दोन्ही काँग्रेसला स्पष्ट बहुमत असतानाही  मंत्री पाटील यांचा महापौरपदाचा दावा कायम आहे. महापालिकेच्या राजकारणात मंत्री पाटील यांचे मोठे मन कोठे गेले  चंद्रकांतदादा जे बोलत आहेत, त्यांच्या मागील बोलवता धनी वेगळाच आहे. त्यांचे बोल म्हणजे महाडिकांचेच वाक्य मंत्र्यांच्या तोंडून येत आहेत.

जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी भाजप महाआघाडीच्या सदस्यांना घेऊन येणाऱ्या गाडीचे सारथ्य राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी केले होते. त्यावरून आमदार हसन मुश्रीफ म्हणाले,की  धनंजय महाडिक यांनी त्यांचा मार्ग आखलेला आहे. त्यांची दिशा त्यांनी स्पष्ट केली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी पक्षविरोधी काम केल्याचा कोणताही अहवाल प्रदेश कार्यकारिणीकडे पाठवणार नाही. महाडिक यांनी काय करायचे हे त्यांनी ठरवावे.

उभय काँग्रेसचे सदस्य सहलीवर

पालकमंत्री  पाटील यांनी आपल्याकडे आणखी ५ सदस्य आल्याचे सांगून विरोधकात खळबळ उडवून दिली.

परिणामी सभापती निवडीत दगाफटका नको यासाठी खबरदारी म्हणून काँग्रेस व राष्ट्रवादीच्या ३० जि. प. सदस्यांना महाबळेश्वर येथे सहलीवर पाठवले. दोन्ही गटांची बांधणी कायम राहावी यासाठी सदस्यांना सहलीवर पाठवण्याची प्रथा आहे, यात नवीन काही नाही, असा खुलासा मुश्रीफ यांनी केला.

त्यांची घरवापसी

भाजप महाआघाडीने शिवसेना सदस्य फोडून जिल्हा परिषदेची सत्ता हस्तगत केली. तेव्हा काँग्रेसच्या जि. प. सदस्या रेश्मा राहुल देसाई व राष्ट्रवादीचे सदस्य विजय बोरगे हे अनुपस्थित राहिले. हे दोघे आज बठकीस उपस्थित राहिले, ही उभय काँग्रेसची जमेची बाजू ठरली.

माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल देसाई यांच्याशी सतेज पाटील यांनी बंद खोलीत चर्चा केली. भाजपसोबत जाऊन काय साधणार,  काँग्रेससोबतच राहा, असा सल्ला पाटील यांनी दिल्याचे समजते.

महाआघाडीत इच्छुक वाढले

सत्ताधारी भाजप महाआघाडीतर्फे महिला व बालकल्याण सभापतिसाठी स्वाभिमानीच्या शुभांगी िशदे, समाजकल्याण सभापती जनसुराज्यच्या पुष्पा आळतेकर, शिक्षण व अर्थ सभापतीसाठी शिवसेनेचे अंबरिश घाटगे, बांधकाम सभापतीसाठी जनसुराज्यचे सर्जेराव पाटील-पेरिडकर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तर , जिल्हा ताराराणी आघाडीचे राहुल आवाडे यांनी बांधकाम सभापतीसाठी फििल्डग लावली आहे.