चंद्रकांत पाटील यांचा सरकारला इशारा

कोल्हापूर : वनमंत्री संजय राठोड यांचा सोमवारपर्यंत राजीनामा घ्यावा. अन्यथा या प्रकरणी तोंड न उघडणाऱ्या सरकारला विधिमंडळात तोंड उघडू देणार नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशन कामकाज होऊ देणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत दिला.

पूजा चव्हाण प्रकरणी मंत्री संजय  याबाबत आमदार पाटील म्हणाले, संजय राठोड यांच्यावर कारवाई का केली जात नाही, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

स्वत:ला सत्यवादी समजणारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार या प्रकरणी गप्प का बसले आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, विधानपरिषदेचे उपसभापती – शिवसेना नेत्या नीलम गोºहे यांनी बोलले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.  याबाबत अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवेदन केले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

राठोड प्रकरणी भाजप महिला आघाडीच्या चित्रा वाघ या वाघिणीप्रमाणे आक्रमक झाल्या असताना त्यांच्या पतीवर गुन्हे दाखल करण्याचे काम राज्य शासन करीत आहे. हा दडपशाहीचा कारभार भाजप खपवून घेणार नाही, असे त्यांनी ठणकावले. आगामी अधिवेशनात शेतकऱ्यांची कर्जमाफी, प्रामाणिक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान, वीज बिल माफी, करोना महामारी काळातील वैद्यकीय साहित्य खरेदीतील प्रचंड भ्रष्टाचार, मराठा समाज आरक्षण आदी प्रश्न आक्रमकपणे मांडू, असे ते म्हणाले.