23 February 2020

News Flash

शिवभोजन थाळी लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री ठाकरे यांचा संवाद

रुद्राक्ष स्वयं महिला बचत गटाच्या अध्यक्ष राजश्री सोलापुरे यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी बातचीत केली.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिवभोजन थाळी लाभार्थी, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याशी ‘वेब लिंक’वरून संवाद साधला.

कोल्हापूर : दादा.. समाधानी आहात का..शिवभोजन थाळी कशी आहे. योजना आवडली का? अशा शब्दांत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मंगळवारी येथे शिवभोजन थाळीचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांंशी आणि बचत गटाच्या अध्यक्षांशी ‘वेब लिंक’वरून संवाद साधला.

अण्णा रेस्टॉरंट येथे २६ जानेवारी रोजी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते शिवभोजन थाळी योजनेचा प्रारंभ करण्यात आला. याच ठिकाणी ठाकरे यांनी लाभार्थ्यांंशी संवाद साधला. भोजनाची गुणवत्ता, टापटिपपणा आणि स्वच्छता यांच्याशी अजिबात तडजोड नको, असा सल्ला ठाकरे यांनी दिला. रुद्राक्ष स्वयं महिला बचत गटाच्या अध्यक्ष राजश्री सोलापुरे यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी बातचीत केली.

सरकारचे वजन वाढले पाहिजे – ठाकरे

अण्णा रेस्टॉरंट येथे देण्यात येणाऱ्या पदार्थांचे, चपातीचे वजन हे प्रमाणापेक्षा जास्त असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. त्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी ‘पदार्थांचे वजन किती आहे हे माहीत नाही, पण सरकारचे वजन वाढले पाहिजे, अशा पध्दतीने काम करा,’ अशी टिप्पणी करताच उपस्थितांनी त्याला दाद दिली.

 

 

First Published on January 29, 2020 1:19 am

Web Title: chief minister thackerays interaction with shiv bhojan thali beneficiaries zws 70
Next Stories
1 ‘एनआयए’ला सहकार्य करा, अन्यथा परिणाम भोगावे लागतील
2 थकीत एफआरपीवर व्याज आकारणी
3 “भीमा कोरेगाव प्रकरणी ‘एनआयए’ला सहकार्य करा, अन्यथा परिणाम भोगावे लागतील”
Just Now!
X