कारणे शोधून प्रवास करणाऱ्यांच्या मार्गात आता कायमचा लाल सिग्नल लागणार आहे. पत्र देणाऱ्या लोकप्रतिनिधीसह संबंधितांवर कोल्हापूर जिल्ह्यात होणार गुन्हा दाखल होणार आहे. पत्रासह वाहनेही जप्त करावीत, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी रविवारी पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.

करोना प्रतिबंधक उपाय योजनेसाठी संचारबंदी अंतर्गत जिल्हा बंदीही लागू  करण्यात आली आहे. जिल्ह्यबाहेरील काही प्रतिष्ठित व्यक्ती, संस्था, काही जबाबदार लोकप्रतिनिधी हे काही व्यक्तींना पत्र देत आहेत. अशा व्यक्ती तपासणी नाक्यांवर पत्र दाखवून जिल्ह्यच्या हद्दीपर्यंत येत आहेत. अशा व्यक्ती जिल्ह्यमध्ये अचानक आल्याने जिल्ह्यमध्ये संसर्ग वाढून जिल्ह्यतील आरोग्य व्यवस्था कोलमडून पडेल. असे प्रकार घडलेले आहेत. त्यामुळे या विरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षकांना निर्देश दिले आहेत. संस्था, प्रतिष्ठित व्यक्ती, लोकप्रतिनिधी यांनी अशी पत्रे दिली असल्यास त्यांनी ती त्वरित मागे घ्यावीत, अन्यथा त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होईल, असा इशाराही देसाई यांनी दिला आहे.

किराणा मालाचा तुटवडा

करोना विषयी आवश्यक उपाययोजनांकरिता खासदार संजय मंडलिक यांनी जिल्हाधिकारी देसाई यांची आज भेट घेऊन दुर्गम,डोंगराळ भागातील जनतेला आरोग्य विषयक सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी खाजगी दवाखाने सुरू करावेत, मेडीकल स्टोअर चोवीस तास सुरू रहावेत, अशी मागणी केली. जिल्ह्यत अनेक ठिकाणी किराणा दुकानात मालाचा तुटवडा जाणवत असल्याने उपाययोजना करण्यासाठी तहसीलदार यांना आदेश द्यावेत, अशीही सूचना केली.

होम क्वारंटाइन उल्लंघन करणाऱ्यावर गुन्हा

होम क्वारंटाइनचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोल्हापुरात एका युवकावर आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल अनिल पाटील (वय २४ रा. उजळाईवाडी) असे या युवकाचे नाव आहे. तो २३ मार्च रोजी मुंबईहून उजळाईवाडीत आला होता.  त्याला होम क्वारंटाइनचा सल्ला देण्यात आला होता. संचारबंदी असतानाही त्याचे उल्लंघन करून तो खुलेआम गावात अकारण फिरताना आढळून आल्याने त्याच्यावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथीचे रोग प्रतीकात्मक कायदा अंतर्गत गोकुळ शिरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.