कॉम्रेड गोिवद पानसरे हत्या प्रकरण

कॉम्रेड गोिवद पानसरे यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्यासाठी गोळीबारात वापरण्यात आलेली बंदुकीच्या ५ रिकाम्या पुंगळ्या आणि पानसरे यांच्या शरीरात सापडलेली १ गोळी ही तपासणीसाठी स्कॉटलंडला पाठवण्याची मागणी बुधवारी कोल्हापूर न्यायालयाने मान्य केली. ही मागणी सरकारी पक्षाच्या वकिलांनी आणि सी.बी.आय.ने केली होती. दरम्यान, येत्या २० मे रोजी समीर गायकवाड वरील उपलब्ध पुराव्यांची पाहणी करून त्याच्यावर दोषारोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे.

कॉम्रेड गोिवद पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारी २०१५ ला त्यांच्या घरासमोरच दोघा अज्ञातांनी बेछूट गोळीबार केला होता. या प्रकरणी सनातन संस्थेचा साधक असणाऱ्या सांगलीतील समीर गायकवाड याला ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणाची सुनावणी येथील न्यायालयात सुरू आहे.

पानसरे यांच्यावर गोळीबार झाला, त्या वेळी घटनास्थळी मिळून आलेल्या ५ रिकाम्या पुंगळ्या आणि पानसरे यांच्या शरीरात सापडलेली १ गोळी ही तपासणीसाठी यापूर्वीच गुजरात आणि बेंगलोर इथल्या प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आल्या होत्या. मात्र या दोन्ही ठिकाणांच्या अहवालात तफावत असल्यानं त्याची फेरतपासणी स्कॉटलंडच्या प्रयोगशाळेत करण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकील आणि सी.बी.आय.ने न्यायालयात केली होती.

या संदर्भात आज न्यायालयाने ५ रिकाम्या पुंगळ्या आणि पानसरे यांच्या शरीरात सापडलेली १ गोळी ही तपासणीसाठी स्कॉटलंडला पाठवण्याची मागणी आज कोल्हापूर न्यायालयाने मान्य केली.