News Flash

इचलकरंजीत काँग्रेसचा धडक मोर्चा

माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला.

इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध मागण्यांसाठी शनिवारी प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला. ज्यांना विश्वासाने प्रतिनिधित्व दिले त्यांनी जनतेचा विश्वासघात केला.  आता जनता सूज्ञ आहे. ती दिशाभूल करणाऱ्यांची सुट्टी केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आवाडे यांनी दिला. महात्मा गांधी पुतळा येथून मोर्चाला सुरुवात झाली.  तो प्रमुख मार्गावरून प्रांत कार्यालयावर आला असता तेथे मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी आंदोलकांनी शासनाच्या निष्क्रिय  धोरणाच्या विरोधात घोषणाबाजी केली. रास्ता रोको केल्याने वाहतुकीची कोंडी झाली. वक्त्यांनी शासन – प्रशासनाच्या कारभाराविरोधात टीकेची झोड उठवली. वारंवार प्रश्न मांडूनही सामान्य जनतेला न्याय मिळत नसल्याबद्दल शामराव कुलकर्णी, अहमद मुजावर, शशांक बावचकर  यांनी संताप व्यक्त केला. माजी मंत्री प्रकाश आवाडे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश मोरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदार वैशाली राजमाने यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.  शिधापत्रिकेवर मिळणारे धान्य आणि रॉकेल, पंतप्रधान आवास योजनेतील अटी जाचक,  संजय गांधी व श्रावणबाळ योजनेसाठी दाखले देताना होणारी टाळाटाळ, यंत्रमाग व्यवसायातील अडचणींचा पाढा वाचण्यात आला. या सर्व मागण्यांची निर्गत तातडीने न झाल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2016 1:42 am

Web Title: congress morcha in ichalkaranji
Next Stories
1 ‘तहसीलदारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करा’
2 करवीरनगरीत गणेशाचे उत्साहात आगमन
3 उसाला ३५०० रुपये पहिली उचल द्या
Just Now!
X