News Flash

शिरोळमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीला खिंडार

मुंबई येथील आकाशवाणी आमदार निवासमध्ये या प्रमुखांची आज सकाळी बठक झाली.

काँग्रेस-राष्ट्रवादी

चार दिग्गज नेते भाजपात

शिरोळ तालुक्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील चार दिग्गज नेते सोमवारी भाजपात डेरे दाखल झाले. मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या दालनात त्यांचे स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. प्रवेश करणाऱ्यांमध्ये तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अनिलकुमार यादव, रत्नाप्पाण्णा कुंभार मागासवर्गीय सूतगिरणीचे अध्यक्ष-दलितमित्र अशोकराव माने, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक िनबाळकर व ज्येष्ठ नेते धनाजीराव जगदाळे यांचा समावेश आहे. यामुळे उभय काँग्रेसला शिरोळ तालुक्यात मोठे िखडार पडले असून नाममात्र असलेल्या भाजपाला बाळसे आले आहे.  जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीसाठी उतरलेल्या भाजपने अन्य पक्षातील दिग्गजांना पक्षात आणण्यासाठी कंबर कसली आहे. याला शिरोळ तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला. काँग्रेस-राष्ट्रवादीतील बडय़ा नेत्यांच्या सावलीत आपली राजकीय वाढ खुंटत असल्याची सल उपरोक्त नेत्यांना होती. त्यातूनच त्यांनी हाती कमळ धरण्याचा निर्णय घेतला.

मुंबई येथील आकाशवाणी आमदार निवासमध्ये या प्रमुखांची आज सकाळी बठक झाली. त्यामध्ये भाजपमध्ये प्रवेशाचा अंतिम निर्णय घेण्यात आला. दुपारी मुख्यमंत्र्यांच्या दालनात त्यांचे स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यांच्याशिवाय डॉ. विजय मगदूम, १२ गावांचे सरपंच, विविध सहकारी संस्थांचे संचालक यांनीही प्रवेश केला. गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांच्यासह काही प्रमुख उपस्थित होते. शिरोळ तालुक्यातील विकासाला अपेक्षित गती देण्यात येईल. तुम्हाला अपेक्षित असलेले रचनात्मक काम होण्यासाठी पाठबळ देण्यात येईल, असे आश्वस्त करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी यादव यांना महामंडळात संधी देण्याचे सूतोवाच केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2017 1:27 am

Web Title: congress ncp worker joined bjp in shirol
Next Stories
1 नोटाबंदीमुळे सर्वच क्षेत्रात मंदी- मुश्रीफ
2 देवस्थान समितीविरोधातील याचिकेवर पुढील आठवडय़ात निर्णय
3 पाच हजारांहून अधिकांनी अवयवदानाचे अर्ज भरले
Just Now!
X