News Flash

सहकारी बँका आंदोलनाच्या तयारीत

केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबदलाचा फटका राज्यातील सहकारी बँकांना मोठय़ा प्रमाणात बसत आहे.

अंधेरीतील डी एन नगरमधून रोकड जप्त करण्यात आली आहे.

नोटाबंदीमुळे व्यवहार ठप्प झाल्याची तक्रार

केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबदलाचा फटका राज्यातील सहकारी बँकांना मोठय़ा प्रमाणात बसत आहे. या निर्णयाच्या विरोधात राज्यातील सहकारी बँकांचे सुमारे वीस हजार कर्मचारी, संचालक आणि ठेवीदार रिझव्‍‌र्ह बँकेवर मोर्चा काढण्याच्या तयारीत असल्याची माहिती येथे जिल्ह्यातील सहकारी बँकांच्या वतीने देण्यात आली.

केंद्र सरकारने ८ तारखेला घेतलेल्या नोटाबदलाच्या निर्णयामुळे नागरिकांना नागरी सहकारी बँकेत पसे भरण्यासाठी व काढण्यासाठी त्रास होऊ लागला आहे. केंद्र सरकारने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे या बँकांतील कर्मचाऱ्यांना, नागरिकांना मोठय़ा प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागतो. बँकांमध्ये नोटा मिळणे असह्य झाल्यामुळे बँकांचे व्यवहार ठप्प झाले असून, ग्राहकांचा रोष ओढवून घ्यावा लागत आहे. या निर्णयाच्या विरोधात राज्यातील सहकारी बँकांचे वीस ते बावीस हजार कर्मचारी रिझव्‍‌र्ह बँकेवर मोर्चा काढण्याचा तयारीत आहेत. हा निर्णय इचलकरंजी येथे झालेल्या नागरी सहकारी बँकेच्या बठकीत घेण्यात आला. नागरी सहकारी बँक फेडरेड व कर्नाड बँक रीसर्च फाऊंडेशन यांच्या वतीने सहकारी बँकेच्या झालेल्या आíथक कोंडीबाबत आज चर्चा झाली.

या बाबतची माहिती कर्नाड बँक रीसर्च फाऊंडेशनचे प्रमुख किरण कर्नाड यांनी पत्रकारांना दिली. ते म्हणाले, नागरी सहकारी बँकांची अवस्था केविलवाणी झाली आहे. महाराष्ट्र राज्यातील नागरी बँकांची अवस्था एकदम हलाखीची झाली आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेकडून नागरी बँकांना नवीन चाळणी नोटा गेल्या दहा दिवसांपासून पुरवठा केला जात नाही, त्यामुळे या बँकेचे कर्मचारी व ठेवीदारांचे हाल होऊ लागले आहेत. शेडय़ूल्ड बँकेकडून सहकार्य होत नसल्यामुळे नागरी बँकांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने दिलेल्या निर्णयाविरोधात राज्यातील सहकारी बँकांचे वीस ते बावीस हजार कर्मचारी, संचालक आणि ठेवीदार रिझव्‍‌र्ह बँकेवर मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत. या प्रश्नी नागरी बँकांचे प्रतिनिधी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करणार आहेत. यातून मार्ग निघेल असा नागरी बँकांना विश्वास आहे, पण तो न निघाल्यास मोर्चा काढणे अपरिहार्य आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2016 12:46 am

Web Title: cooperative banks ready for agitation note banned issue
Next Stories
1 बेळगाव महामेळाव्यास हजारो मराठी भाषकांची उपस्थिती
2 मराठी भाषकांचा महामेळावा परवानगीशिवायही होणारच !
3 दानपेटय़ांतील हजार, पाचशेचा तपशील मिळेना
Just Now!
X