News Flash

फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती कर्नाटकात; बेळगावातील दोन रुग्णालयांचा समावेश

यामुळे सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील नागरिकांना होणार फायदा

संग्रहित छायाचित्र

सामान्यांसाठी वरदान ठरलेल्या महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेची व्याप्ती आता कर्नाटक राज्यातही वाढली आहे. सीमाभागाचे केंद्रस्थान असलेल्या बेळगाव येथील दोन रुग्णालयांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. यामुळे सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील नागरिकांना फायदा होणार असल्याचे आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी रविवारी सांगितले.

बेळगाव येथील केएलईएस डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर आणि केएलईएस कॅन्सर हॉस्पिटल या दोन रुग्णालयांचा जन आरोग्य योजनेत सहभाग करून घेण्यासाठी राज्यमंत्री डॉ. यड्रावकर यांनी पाठपुरावा केला होता. कोरे हॉस्पिटलचे सुमारे २ हजार बेड आणि विशेषज्ञ सुविधा या योजनेतंर्गत उपलब्ध होणार असून कर्करोग रूग्णालयामधील १२५ बेड उपलब्ध होणार आहेत. त्यामध्ये कर्करोग उपचार, शस्त्रक्रिया, रेडिएशन आदी सुविधा मिळणार आहेत.

राज्यात जनआरोग्य योजनेमध्ये यापूर्वी ४५० रुग्णालयांचा सहभाग होता त्यानंतर त्याची व्याप्ती वाढवत दुप्पट म्हणजे १ हजार रुग्णालयांचा सहभाग करण्यात आला आहे. राज्याच्या सीमेलगतच्या भागातील रुग्णालयांचा समावेश या योजनेत झाल्याने कोल्हापूर, सांगली, सातारा येथील नागरिकांना त्याचा फायदा मिळेल, असे आरोग्य राज्यमंत्र्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2020 10:21 pm

Web Title: coverage of mahatma jotiba phule jan aarogya yojana in karnataka including two hospitals in belgaum aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 खंडणीप्रकरणी इचलकरंजीचे माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांच्यावर गुन्हा दाखल
2 भाजप प्रदेशाध्यक्षपदाबरोबर उपाध्यक्षपदही कोल्हापूरला
3 Coronavirus : कोल्हापूर जिल्ह्य़ात करोनाचे १२ नवे रुग्ण
Just Now!
X