01 December 2020

News Flash

प्राध्यापकास धमकावल्या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

माजी स्थायी सभापती आदिल फरास हे आपल्या तीन समर्थकांसह सकाळी कॉमर्स कॉलेजमध्ये गेले होते.

येथील कॉमर्स कॉलेजच्या दारात गाडी लावण्याच्या कारणावरून महाविद्यालयातील प्राध्यापकास धमकावल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचा युवा नेता, माजी स्थायी सभापती आदिल फरास यांच्यासह चौघांवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची तक्रार प्रा. प्रफुल्ल मांगोरे पाटील यांनी दिली.

माजी स्थायी सभापती आदिल फरास हे आपल्या तीन समर्थकांसह  सकाळी कॉमर्स कॉलेजमध्ये गेले होते. कॉलेजच्या प्रवेशद्वाराजवळ मोटार लावण्याच्या कारणावरून फरास यांचा महाविद्यालयाच्या शिपायाशी वाद झाला होता. यामध्ये मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या प्रा. मांगोरे यांना फरास यांच्यासह तिघांनी धक्काबुक्की करत शिवीगाळ केली होती.

याबाबत मांगोरे यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात जाऊन लेखी तक्रार दिली होती. यानुसार चौकशी करून पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी आदिल बाबू फरास, सुशांत पाटील यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल केला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2016 2:20 am

Web Title: criminal case filed against 4 people in professor threatening case
Next Stories
1 पावसाने पोटमाळा कोसळून नातवासह आजोबांचा मृत्यू
2 नंदवाळला आषाढी यात्रा उत्साहात
3 कोल्हापुरातील ‘स्ट्रॉर्म वॉटर प्रकल्प’ अपयशाच्या भोवऱ्यात
Just Now!
X