23 July 2019

News Flash

सुनेची आत्महत्या नव्हे हत्या, पोलीस तपासात वास्तव उघड

आईच्या निधनामुळे आनंद व्यक्त केल्याने पतीनेच पत्नीची हत्या केली असल्याचे तपासात आता उघड झाले आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

कोल्हापूर : सासूवरील मातृवत प्रेमापोटी तिच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने सुनेने आत्महत्या केल्याच्या प्रकरणाने आता खळबळजनक वळण घेतले आहे. या प्रकरणात शुभांगी लोखंडे या सुनेने आत्महत्या केलेली नाही तर तिची हत्या करण्यात आल्याचे जुना राजवाडा पोलिसांनी केलेल्या तपासात बुधवारी उघड झाले आहे.

येथील आपटेनगरमध्ये शनिवारी हा प्रकार घडला होता. या घटनेमध्ये सासूवरील प्रेमापोटी तिच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने सुनेने आत्महत्या केल्याचा बनाव रचण्यात आला होता. आईच्या निधनामुळे आनंद व्यक्त केल्याने पतीनेच पत्नीची हत्या केली असल्याचे तपासात आता उघड झाले आहे. पतीवर आम्हाला संशय होता त्यामुळे पोलिसी खाक्या दाखवताच त्याने पत्नीच्या हत्येची कबुली दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर पती संदीप लोखंडे याला अटक करण्यात आली आहे.

शनिवारी पहाटे सासू मालती लोखंडे (वय ७०) यांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर ४० वर्षीय सुनेने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून जीवनयात्रा संपवल्याचे वृत्त माध्यमांनी दिले होते. यात अंधश्रद्धेचा प्रकार असल्याचे देखील प्रथमदर्शनी दिसत होते.

आईच्या निधनानंतर पत्नीने व्यक्त केलेले चेहऱ्यावरील हावभाव पाहून संदीप संतप्त झाला. त्याने ती केर काढत असताना तिला इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उचलून फेकून दिल्यावर ती गंभीर जखमी झाली. यावर न थांबता त्याने खाली जाऊ न डोक्यात फरशी घातली. त्यातच तिचा मृत्यू झाला. शहर पोलिस अधीक्षक प्रेरणा कट्टे व नूतन पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी या घटनेचा यशस्वी तपास केला.

First Published on March 14, 2019 2:13 am

Web Title: daughter in law not commit suicide but killed truth found in police investigation