News Flash

भाजप तालुकाध्यक्षाला १० लाखांचा गंडा

टेंभुर्णी-नगर रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी खडी पुरविण्याचे काम कंत्राटदार कंपनीकडून मिळवून देण्याचे आमिष दाखवून भाजपच्या करमाळा तालुकाध्यक्षाकडून कमिशनपोटी दहा लाख ५० हजारांची रक्कम घेतली

टेंभुर्णी-नगर रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी खडी पुरविण्याचे काम कंत्राटदार कंपनीकडून मिळवून देण्याचे आमिष दाखवून भाजपच्या करमाळा तालुकाध्यक्षाकडून कमिशनपोटी दहा लाख ५० हजारांची रक्कम घेतली आणि काम मिळवून न देता त्यांची फसवणूक केली म्हणून मुंबईतील एका कंपनीच्या प्रकल्प व्यवस्थापकासह लायझनिंग अधिकाऱ्याविरुद्ध करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
करमाळा तालुका भाजपचे अध्यक्ष गणेश नागनाथ चिवटे यांनी यासंदर्भात दिलेल्या फिर्यादीनुसार मुंबईच्या सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया लि. या कंपनीमार्फत सध्या टेंभुर्णी-करमाळा-नगर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी कंपनीला एक कोटी २० लाख रुपये किमतीची खडी हवी होती. प्रकल्प व्यवस्थापक नौशाद आलम व कंपनीचे लायझेनिंग अधिकारी मयूर जयंतीलाल अन्नम (रा. मुलुंड, मुंबई) यांनी खडी पुरविण्याचे काम मिळवून देतो असे आमीष दाखवून गणेश चिवटे यांना आपल्या जाळ्यात ओढले. एक कोटी २० लाख रुपये किमतीची खडी पुरविण्याच्या कामात दहा टक्के प्रमाणे दहा लाख ५० हजारांचे कमिशन आलम व अन्नम यांनी घेतले. गेल्या जानेवारी महिन्यातच करमाळ्यातील चिटवे यांच्या निवासस्थानी व याच भागातील एका हॉटेलात हा व्यवहार झाला. परंतु कमिशन घेतल्यानंतर कंपनीच्या नावाने बनावट कार्यारंभ आदेश दिला. हा फसवणुकीचा प्रकार उजेडात आल्यानंतर अखेर चिवटे यांनी करमाळा पोलीस ठाण्यात धाव घेतली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2016 1:40 am

Web Title: deceive of bjp leader in solapur
टॅग : Solapur
Next Stories
1 सांगली-मिरजमधील शाळांमध्ये मराठी राजभाषा दिन साजरा
2 महालक्ष्मी मंदिरापासून अवघ्या २०० मीटरवर भरला जातो रॉकेलचा टँकर
3 कोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेमध्ये सदस्यांची टीकेची झोड
Just Now!
X