News Flash

दिल्ली विजयाचा कोल्हापुरात ‘आप’कडून जल्लोष

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर शहरातून आपचे पंधरा कार्यकर्ते गेले होते.

दिल्ली विजयाचा कोल्हापुरात ‘आप’कडून जल्लोष
दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर आम आदमी पक्षाचे नारायण पोवार, संदीप देसाई, नीलेश रेडेकर, उत्तम पाटील आदींनी लोकांना मिठाई वाटप केले.

कोल्हापूर : दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाने मिळवलेल्या अभूतपूर्व यशाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी कोल्हापूरमध्ये आप च्या वतीने  विजयोत्सव साजरा करण्यात आला. शहरातील विविध चौकात मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला.

आपच्या कार्यकर्त्यांंनी राजारामपुरी येथील हनुमान मंदिर पासून विजयी मिरवणूक काढली. मध्यवर्ती बस स्थानक, व्हीनस चौक, बिंदू चौक, शिवाजी पुतळा येथे फिरून दसरा चौक येथे मिरवणुकीची सांगता केली. प्रत्येक चौकात नागरिकांना बुंदीचे वाटप केले. या वेळी नारायण पोवार,  संदीप देसाई, नीलेश रेडेकर, उत्तम पाटील, भिकाजी कांबळे,  इलाही शेख, दीपक नंदवाणी, वैशाली कदम, गणेश बकरे आदी उपस्थित होते. त्यांच्या हातामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या प्रतिमा आणि झाडू हे पक्षाचे चिन्ह होते.

कोल्हापूरचा खारीचा वाटा

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर शहरातून आपचे पंधरा कार्यकर्ते गेले होते. त्यांनी वेगवेगळ्या विधानसभा मतदार संघात कसून प्रचार केला होता. त्यातील बहुतांशी मतदार संघात आपचे उमेदवार निवडून आल्याने आपच्या विजयात या कोल्हापूरचाही खारीचा वाटा असल्याबद्दल शहरातील कार्यकर्त्यांंकडून आनंद व्यक्त केला जात होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2020 2:00 am

Web Title: delhi assembly election result 2020 aap celebrated delhi victory in kolhapur zws 70
Next Stories
1 ग्रामीण भागातील बांधकाम परवाने आता पुन्हा स्थानिक पातळीवर
2 कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या निलोफर आजरेकर
3 ‘केंद्राच्या धरसोड धोरणांमुळे देशातील उद्योजकांचीही गुंतवणुकीबाबत अनास्था’
Just Now!
X