प्रशासनाला बरोबर घेऊन दुष्काळी भागामध्ये जलसंधारणाची कामे करण्याची इच्छा आहे त्यासाठी मी श्रमदानही करू इच्छितो असे सांगून राज्यातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुका, बीड, अमरावती येथेही कायमस्वरूपी जलसंधारणाची कामे करणार असल्याचे अभिनेता आमीर खान याने सांगितले.
आमीर खान याने सत्यमेव जयते या कार्यक्रमाअंतर्गत सत्यमेव जयते वॉटर कप स्पध्रेतील स्पर्धक गावांच्या प्रसासकीय अधिकारी व कर्मचारयांची बठक जिल्हाधिकारी कार्यालय येथे नियोजन भवनात घेतली. या बठकीस जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख, उपजिल्हाधिकारी पराग सोमण उपस्थित होते. यावेळी आमीर खानने आपल्या कार्याची माहिती देऊन कोरेगाव येथील कामाची माहिती घेऊन तेथील कामाच्या प्रगतीचे कौतुक केले. यावेळी आमीर खान म्हणाला, ‘लोकांनी पाणी बचत व पाणी संवर्धन करणे आवश्यक आहे. राज्यभर आम्ही प्रबोधनाचे कामही करणार आहोत. हे काम केवळ आम्ही एकटेच करणार नसून आम्ही प्रशासनाची मदत, मार्गदर्शन व सहकार्यही घेणार आहोत. जलसाक्षरतेची चळवळ गावोगावी पोचवणार असून त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला सहभागी करून घेणार आहोत. जलसंधारणाच्या या चळवळीस केवळ आíथक पाठबळ देणे किंवा घेणे हा उद्देश नसून मी स्वत देखील श्रमदान करण्यास उत्सुक आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, अमरावती, बीड हे जिल्हे आमचे या वर्षीचे उद्दिष्ट आहे, तर पुढील वर्षी राज्यातील ३० तालुक्यांमध्ये आम्ही जलसंधारणाची कामे आणि प्रबोधन करणार आहोत. जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी कोरेगाव तालुक्यातील जलसंधारणाच्या कामाची माहिती दिली तसेच शासनाचे जलसंधारणाचे कार्यक्रम आम्ही यशस्वीपणे पूर्ण करणार आहोत असेही त्यांनी सांगितले. या बठकीला सातारा जिल्ह्यातील शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.