News Flash

‘प्रगती, उन्नतीच्या नावाखाली पर्यावरणामध्ये मानवी आक्रमण’

नाईकडे म्हणाले,की मानवी जीवनाचा पर्यावरण हा आविभाज्य भाग आहे.

प्रगती, उन्नतीच्या नावाखाली पर्यावरणामध्ये मानवी आक्रमण मोठय़ा प्रमाणावर झाले आहे. पर्यावरण संवर्धनासाठी प्रदूषण रोखणे ही सर्वाचीच जबाबदारी आहे,  असे विचार दि इन्स्टिटय़ूशन ऑफ इंजिनिअरींग ( इंडिया ) पुण्याचे पर्यावरण अभियंता आर. व्ही. सराफ यांनी मांडले.

स्वामी विवेकानंद महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कोल्हापूरचा वनविभाग, सामाजिक वनीकरण, आयटीई आणि दि इन्स्टिटय़ूशन ऑफ इंजिनीअरिंग ( इंडिया )  यांच्या संयुक्त विद्ममाने आयोजित समारंभाप्रसंगी  पुण्याचे पर्यावरण अभियंता आर. व्ही. सराफ, कोल्हापूरचे उप वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक टी. पी. पाटील, डॉ. बार्गी, डी. आर. जाधव, महाजन, एस. एम खतकल्ले, वन विभागाचे देशपांडे, प्रा. िहदुराव पाटील, पर्यावरण विभागाचे िशदे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी वृक्षांना मान्यवरांच्या हस्ते जल अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सराफ म्हणाले,की निसर्गाकडून येणारे पाणी व त्याचा वापर यांची वजाबाकी केली जात नाही, द्राव्य पदार्थ वेगळे करण्याची आवश्यकता, पिण्याचे, वापराचे पाणी, पाण्याची सुरक्षितता, उद्योगधंद्यांमध्ये वापरले जाणारे पाणी, वापरुन झालेल्या पाण्याचा पुनर्वापर याबाबत सादरीकरणासह सखोल माहिती दिली व मार्गदर्शन केले. राज्यात पावसाअभावी निर्माण झालेली स्थिती पाहता येत्या दशकात पाण्यास येणारे अमूल्य महत्त्व याबाबत आतापासून उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. नाईकडे म्हणाले,की मानवी जीवनाचा पर्यावरण हा आविभाज्य भाग आहे. सजीवांना आवश्यक असणारा ऑक्सिजन वनांपासून मिळत असल्याने वनांचे महत्त्व, वन्यप्राण्यांची आवश्यकता, पर्यावरण साखळीचे सखोल महत्त्व, जागतिक तापमानवाढीस कारणीभूत असलेल्या जंगलतोडी थांबविणे, वन्य प्राण्यांच्या बेकायदेशीर होणाऱ्या व्यापारास आळा घालणे आदिबाबत मार्गदर्शन करुन जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व विशद केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2016 1:52 am

Web Title: development is harmful for environment
टॅग : Development,Environment
Next Stories
1 हिंदुत्त्ववादी संघटनांकडून महालक्ष्मी मंदिराच्या आवारातील स्वच्छतागृह पाडण्याचा प्रयत्न
2 खासगी उद्योगातील आरक्षणावर ठाम – पासवान
3 शेतकऱ्यांसाठी ३८ लाख कोटींची केंद्राची तरतूद
Just Now!
X