कोल्हापूर

महिन्याभराच्या अंतरात माजी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे भाजपने तिसरे पद सोपवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश केलेले महाडिक यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्रच्या प्रवक्तेपदाची नवी जबाबदारी देण्यात आली आहे. पक्ष प्रवेशानंतर त्यांना सातत्याने नवनव्या जबाबदाऱ्या मिळत असल्याने सध्या त्याचीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी महाडिक परिवाराची जवळीक आहे असे बोलले जाते. लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतरही महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर ऑगस्ट महिन्यात त्यांना प्रदेश उपाध्यक्षपद देण्यात आले होते.

uddhav thackeray eknath shinde (2)
ठाकरे गटाचा कल्याण लोकसभेचा उमेदवार ठरला? अयोध्या पौळ माहिती देत म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांच्या खासदार मुलाच्या…”
Solapur ram Satpute
सोलापुरात भाजप उमेदवार सातपुतेंच्या गाठीभेटी सुरू, काशी जगद्गुरूंचे घेतले आशीर्वाद
Pankaja Munde
“शत्रूच्या दारात जाऊन…”, पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी वाढल्यानंतर पंकजा मुंडेंचं विधान; म्हणाल्या…
bhavana gawali started preparing for lok sabha election after meeting with cm eknath shinde
भावना गवळी कामाला लागल्या, मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन परतताच….

गेल्या महिन्यात भाजपने नवी कार्यकारिणी जाहीर करताना महाडिक यांच्याकडे कायम निमंत्रित सदस्यपद देण्यात आले होते. त्यावरून नाराजी व्यक्त झाल्यानंतर लगेचच त्यांच्याकडे राज्यातील साखर कारखाना विभागाचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. तर आता महाडिक यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्रचे प्रमुखपद देण्यात आले आहे. एकाच महिन्यात पक्षाची तीन पदे मिळवणारे महाडिक हे कोल्हापुरातील एकमेव राजकीय नेते ठरले आहेत.

“पक्षाने दिलेली जबाबदारी सार्थपणे पार पाडण्याचा प्रयत्न करेन. तसेच उपक्रम, योजना आणि ध्येय-धोरणांची व्यापक माहिती देण्यासाठी कटिबध्द राहीन”, अशी प्रतिक्रिया धनंजय महाडिक यांनी दिली.

प्रदेश भाजपाचे विभागनिहाय प्रवक्ते

केशव उपाध्ये – मुख्य प्रवक्ते

खासदार भारती पवार – उत्तर महाराष्ट्र, धनंजय महाडीक – पश्चिम महाराष्ट्र, आ‍मदार गोपीचंद पडळकर – पश्चिम महाराष्ट्र, आमदार राम कदम – मुंबई, शिवराय कुलकर्णी – विदर्भ, एजाज देखमुख – मराठवाडा, भालचंद्र शिरसाट – मुंबई, राम कुलकर्णी – मराठवाडा, श्वेता शालिनी – पुणे, अॅड. राहुल नार्वेकर – मुंबई.