28 October 2020

News Flash

युतीत अजूनही संवाद सुरू – पूनम महाजन

केंद्र व राज्य सरकारच्या कारभाराबद्दल महाजन यांनी समाधान व्यक्त केले . 

खासदार पूनम महाजन

भाजप – शिवसेना यांच्यातील युती तुटलेली नाही. युती करण्याबाबत दोन्हीकडील पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. अजूनही युतीत संवाद सुरु आहे, असे मत भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा ,  खासदार पूनम महाजन यांनी येथे गुरुवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले . मात्र, याचवेळी संवाद कोण कोणाशी साधत आहे याबाबत मौन पाळत ते माध्यमांना माहिती असल्याचे  मोघम उत्तर दिले  .

पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या खासदार पूनम महाजन यांचे आज करवीर नगरीत जोरदार स्वागत करण्यात आले. ताराराणी पुतळा येथून त्यांच्यासमवेत रॅली काढण्यात आली. या वेळी त्यांचा चांदीची तलवर देऊन सत्कार करण्यात आला.

यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सत्तेत येण्यापूर्वी आक्रमक असणारा भाजयुमोचा सावध, बचावात्मक पवित्रा  महाजन यांच्या संवादावेळी वेळोवेळी दिसत राहिला. बहुतेक प्रश्नांची त्रोटक, आटोपशीर उत्तरे देण्यावर त्यांनी भर दिला. केंद्र व राज्य सरकारच्या कारभाराबद्दल महाजन यांनी समाधान व्यक्त केले .  त्या म्हणाल्या , सरकारकडून जनतेच्या अपेक्षा वाढीस आहेत. त्या पूर्ण करणे हे आव्हान आहे , पण आमचे  सरकार बॅकफूटवर गेलो आहोत असे कोणत्याही संवादातून माझ्यासमोर आलेले नाही, ही सरकारच्या कामगिरीची सकारात्मक बाजू आहे .

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम चांगले असले तरी त्यांच्यासोबत सक्षम चमू नसल्याचे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल  एका मुलाखतीत व्यक्त केले होते.

त्याचे खंडन करत  महाजन यांनी मोदींच्या  कामगिरीची तुलना भारताचा क्रिकेट कर्णधार विराट कोहलीच्या खेळीशी  केली.

मुंडेंऐवजी फडणवीस योग्य

जनतेच्या मनातला मुख्यमंत्री मी आहे, असे विधान करून पंकजा मुंडे यांनी आपली इच्छा प्रकट केली होती . याबाबतच्या प्रश्नावर बोलताना महाजन यांचा कल फडणवीस यांच्या बाजूचा दिसला. मुख्यमंत्री जनतेच्या मनातला असला पाहिजे, मग तो पुरुष की महिला याला महत्त्व नाही. भाजप नेहमी कामाला  महत्त्व देतो. आता जो मुख्यमंत्री आहे तो जनतेच्या मनातला आहे, असे उत्तर  महाजन यांनी दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2018 12:59 am

Web Title: dialogue still in progress for bjp shiv sena alliance says poonam mahajan
Next Stories
1 कोल्हापुरात शिवज्योत घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांवर काळाचा घाला; ५ ठार, २५ जखमी
2 पवारांच्या दौऱ्यानंतरही राष्ट्रवादीतील मतभेद संपेनात
3 नव्या धोरणामुळे वस्त्रोद्योगाला फायदा
Just Now!
X