News Flash

संशयास्पद व्यवहारांमुळेच जिल्हा बँकांवर बंदी!

मुख्यमंत्र्यांची माहिती

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

मुख्यमंत्र्यांची माहिती

नोटाबदलाच्या निर्णयानंतर राज्यातील जिल्हा बँकांमध्ये रातोरात हजारो कोटी रुपये जमा झाले आहेत. पहिल्या एक – दोन दिवसात राष्ट्रीयीकृत बँकांपेक्षा जिल्हा बँकेत सातपटीने अधिक रोकड जमा झाली. हे सारेच संशयास्पद असल्याने या बँकांवर रिझव्‍‌र्ह बँकेने नवीन नोटा स्वीकारण्याबाबत र्निबध घातले आहेत. मात्र शेतकरी व ग्राहकांची गरसोय होऊ नये यासाठी सहकारी बँकांना र्निबध घालून परवानगी द्यावी, अशी मागणी केंद्र शासनाकडे केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे दिली.

नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्हय़ाच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी आज ही माहिती दिली. ते म्हणाले, की राज्यातील बहुतांशी जिल्हा सहकारी बँकांचे नियंत्रण राजकारण्यांच्या हाती आहे. त्यांच्याकडून काळा पसा पांढरा होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती बँकांच्या रांगेत आणि राजकारणी मात्र आपले पसे विना त्रास बदलून घेण्याच्या प्रयत्नात असे चित्र निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवेळी मागे या जिल्हा बँकांनी खोटी खाती दाखवून अनुदान लाटण्याचा प्रयत्न केला होता, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2016 2:06 am

Web Title: district bank ban for currency exchange
Next Stories
1 कोल्हापूर जिल्हा बँक कर्मचाऱ्यांचे नोटाबंदी निर्णयाच्या विरोधात आंदोलन
2 सहकारी बँका आंदोलनाच्या तयारीत
3 बेळगाव महामेळाव्यास हजारो मराठी भाषकांची उपस्थिती
Just Now!
X