News Flash

कोल्हापुरात डॉल्बीमुक्त मिरवणुकीसाठी पुढाकार

विघ्नहर्त्यांच्या आगमनामुळे शहरात १० दिवसांपासून आनंददायी चतन्यमय वातावरण आहे.

विसर्जन मिरवणूक मार्गावरील व्यवस्थेसाठी मंडप उभारण्यात आले आहेत तर विसर्जन तळय़ांभोवतीही सुविधा निर्माण केल्या आहेत. (छाया - राज मकानदार) 

 

गेल्या दहा दिवसांपासून पाहुणचार घेणाऱ्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी अवघी करवीरनगरी सज्ज झाली आहे. बहुतांशी मंडळांनी स्वत:हून डॉल्बीमुक्त मिरवणूक काढण्यासाठी पुढाकार घेतला असल्याने यंदा प्रथमच पोलिसांना डॉल्बीचे आव्हान राहणार आहे. बुधवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू राहिली. ती उद्याही तशीच सुरू राहण्याची चिन्हे असून यामुळे विसर्जन मिरवणूक गतीने पुढे सरकण्याचा अंदाज बांधत प्रशासन व पोलीस बाप्पांना मनोमनी नमन करीत आहेत.

विघ्नहर्त्यांच्या आगमनामुळे शहरात १० दिवसांपासून आनंददायी चतन्यमय वातावरण आहे. भव्यदिव्य गणेशमूर्तीसह विविध देखावे पाहण्यासाठी नागरिकांच्या अलोट गर्दीमुळे शहरातील रस्ते गर्दीत हरवून गेले होते. गेल्या दहा दिवसांपासून वातावरणात चतन्याचा आभास निर्माण करणाऱ्या गणेशाला आता निरोप देण्याची वेळ आली आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी सर्वच मंडळांनी मोठी तयारी केली आहे. तुकाराम तालीम मंडळाच्या मानाच्या गणपतीच्या मिरवणुकीने विसर्जन मिरवणुकीस सुरुवात होणार आहे. डॉल्बी विरहित मिरवणुकीला साद देत अनेक मंडळांनी धनगरी ढोल, ताशे अशा पारंपरिक वाद्यांना पसंती दिली. तरीही विसर्जन मिरवणूक शांततेत आणि वेळेत पार पडावी यासाठी महापालिकेने जय्यत तयारी केली आहे.

गणेश विसर्जन मिरवणुकीचा मार्ग, होणारी गर्दी, मंडळांची संख्या या साऱ्याचा विचार करून महापलिका प्रशासनाने मिरवणुकीची जय्यत तयारी केली आहे. मिरवणुकीवर २१ सीसीटीव्ही कॅमेरे, आठ मनोरे, जलद कृती दल, निर्भयासह साध्या गणवेशातील पोलिसांची तीन पथके, एक हजार पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या ताफ्याची करडी नजर राहणार आहे. स्थानिक पोलिसांसह सांगली, नागपूर येथील पोलिसांची कुमकही बंदोबस्तासाठी येणार आहे. मिरवणुकीचे मार्ग २१ सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली राहणार आहेत. वाद, मारामाऱ्या, मद्यपींचा उपद्रव आणि छेडछाडीच्या प्रकारावर या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येईल. मिरवणूक मार्गावर साध्या गणवेशातील २ अधिकारी व १० कर्मचाऱ्यांची पथके कार्यरत राहणार आहेत. मिरजकर तिकटी, बिनखांबी महाद्वार चौक, पापाची तिकटी, गंगावेस, पंचगंगा नदी घाट अशा आठ मनोऱ्यांवरूनही मिरवणूक संपेपर्यंत पोलिसांकडून लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच वादाचे प्रसंग घडू नयेत यासाठी मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, ताराबाई रोड, पापाची तिकटी येथे खास पथके तनात करण्यात आली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2016 1:28 am

Web Title: dolby free kolhapur
Next Stories
1 ‘पर्ल्स’मधील गुंतवणूकदारांचे पैसे लवकरच मिळणार
2 कोल्हापुरात देखाव्यांबरोबर रस्तेही गर्दीने खुलले
3 तावडेच्या कोठडीतील अन्य आरोपींना हलविले
Just Now!
X