News Flash

नारळीकर दाम्पत्यास दाभोलकर पुरस्कार

डॉ.नरेंद्र दाभोलकर स्मृती सामाजिक पुरस्कार प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर आणि त्यांच्या पत्नी मंगला नारळीकर यांना जाहीर करण्यात आला.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृती निमित्त सातारा नगर पालिकेतर्फे दिला जाणारा तिसरा डॉ.नरेंद्र दाभोलकर स्मृती सामाजिक पुरस्कार प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर आणि त्यांच्या पत्नी मंगला नारळीकर यांना जाहीर करण्यात आला. पुरस्कार वितरण दि.१३ डिसेंबर रोजी, शाहू कला मंदिरात होणार आहे. एक लाख रुपये रोख, सन्मान चिन्ह, शाल असे या पुरस्काराचे स्वरूप असल्याचे नगराध्यक्ष विजय बडेकर यांनी सांगितले.
बडेकर म्हणाले, रविवारी सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या या समारंभात पुरस्काराचे वितरण जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांच्या हस्ते होणार आहे. गेल्या चार दशकांपासून त्यांचे अंतरिक्ष संशोधन, साहित्य सेवेचे कार्य सुरू आहे. या कार्यात मंगलाताई नारळीकर यांनी त्यांना मदत केली आहे.  तसेच ‘पाहिलेले देश भेटलेली माणसे’ हे त्यांचे स्वतंत्र पुस्तक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2015 3:00 am

Web Title: dr dabholkar award to mr and mrs naralikar
Next Stories
1 स्वतंत्र विदर्भाच्या विधानावरून कोल्हापुरात शिवसेनेची निदर्शने
2 कोल्हापुरात पोलीस मित्रांना प्रशिक्षण
3 कोल्हापुरात ‘रॅगींग’मधून ६ विद्यार्थ्यांना मारहाण
Just Now!
X