शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागप्रमुखपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांची निवड झाली आहे. गावगाडय़ाचं वास्तव रेखाटणारा लेखक अशी ओळख असणाऱ्या गवस यांना पुन्हा या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. वनस्पतिशास्त्र विभागाच्या प्रमुखपदी डॉ. डी. के. गायकवाड, डॉ. व्ही. जे. फुलारी (भौतिकशास्त्र), डॉ. अकल्पिता अरिवदेकर (जैवरसायनशास्त्र), तर डॉ. सुमन बुवा (प्रौढ व निरंतर शिक्षण विभाग) यांचीही विभागप्रमुखपदी निवड झाली आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गवस यांची यापूर्वी सन २०१३-१४ मध्ये मराठी विभागप्रमुखपदी निवड झाली होती. गवस हे ऐंशीच्या दशकानंतरचे मराठीतील एक महत्त्वाचे लेखक आहेत. कथा, कादंबरी, ललितगद्य, कविता आदी वाङ्मयप्रकार हाताळत त्यांनी ग्रामीण वास्तवाचं यथार्थ चित्रण केलं आहे.  सध्या विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक असणाऱ्या डॉ. डी. के. गायकवाड यांची वनस्पतिशास्त्र विभागप्रमुखपदी पुन्हा नियुक्ती झाली आहे. सन २०१४ मध्ये जून ते सप्टेंबरदरम्यान त्यांनी या पदाचे कामकाज सांभाळले होते. विद्यापीठातील लीड बोटॅनिकल गार्डनच्या दुसऱ्या टप्प्यात वनस्पती वर्गीकरण केंद्र साकारण्याला प्राधान्य देणार असल्याचे डॉ. गायकवाड यांनी सांगितले.

Narendra Modi, Karad, public meeting,
नरेंद्र मोदींची कराडमध्ये ३० एप्रिलला जाहीर सभा, उदयनराजेंच्या प्रचारार्थ आयोजन
After the suspension Vice-Chancellor Dr Subhash Chaudhary took charge of Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University
नागपूर: निलंबनानंतर कुलगुरू डॉ. चौधरींनी पदभार स्वीकारला
educational decision
‘या’ शैक्षणिक निर्णयामुळे निवडणुकीत फटका? पुण्यातील शिक्षण संस्थेने शिक्षण मंत्र्यांना पाठविलेल्या पत्राची चर्चा
Uday Samant Nagpur
“रत्नागिरी – सिंधुदुर्गवर आमचाच हक्क” – उदय सामंत