राज्यातील दुष्काळी भागातील जनता होरपळत असताना राज्यकत्रे उदासीन राहिले आहेत. जनतेच्या मनातील वेदनांचा थांगपत्ता त्यांना लागलेला दिसत नाही. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ येथील भेदक दुष्काळाबरोबरच शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या याला दिल्लीतील सुलतानी संकट जबाबदार आहे, असा जोरदार हल्ला शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा. डॉ.एन.डी.पाटील यांनी रविवारी येथे बोलताना शासनावर चढविला.
ज्येष्ठ नेते कॉ. गोिवद पानसरे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणीच्या बठक आणि अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी  राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन झाले असता प्रा. पाटील बोलत होते. या अधिवेशनात राज्यभरातून सुमारे  ३०० हून अधिक प्रमुख पदाधिकारी, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष सहभागी झाले होते.
यावेळी ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी.पाटील, जेष्ठ विचारवंत डॉ.आ.ह.साळुंखे, माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले, अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी मार्गदर्शन केले. या अधिवेशनात जातपंचायतविरोधी अभियान, वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प, विज्ञानबोध वाहिनी, संविधान बांधीलकी महोत्सव, बुवाबाजी संघर्ष मार्गदर्शन करण्यात आले.
दुष्काळी भागातील परिस्थितीचे विवेचन करून प्रा. पाटील म्हणाले, मराठवाडा आणि विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या आजही होत आहेत. सरकारने शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा दिल्या नसल्यानेच उगवू पाहणारे पिकही वाया गेले. सरकारची अनास्था यास कारणीभूत ठरल्याची टीका त्यांनी केली.
यावेळी ‘अंनिस’चे राज्य प्रधान सचिव माधव बावगे, मििलद देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष सुनील स्वामी, सरचिटणीस ठकसेन गोराने, विनायक सावळे, जिल्हा सचिव रमेश वडणगेकर, उमेश सूर्यवंशी, कृष्णात कोरे, सीमा पाटील आदींसह ‘अंनिस’चे राज्यभरातून जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी कार्यकत्रे उपस्थित होते.