‘ऐसपस गप्पा दुर्गाबाईंशी’ या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांची घेतलेली प्रदीर्घ मुलाखत सीडीच्या स्वरूपात आणण्याचे काम लवकरच हाती घेणार असल्याची माहिती, या पुस्तकाच्या लेखिका प्रतिभा रानडे यांनी दिली. अक्षर दालन आणि निर्धार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या विशेष संवाद कार्यक्रमावेळी त्यांनी आपल्या कोल्हापुरातील आठवणींना उजाळा दिला.
पर्यटन अभ्यासिका व लेखिका अरूणा देशपांडे यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमावेळी उपस्थित रसिकांनी प्रतिभा रानडे यांच्या अफगाण डायरी, ऐसपस गप्पा दुर्गाबाईंशी, काबूल, कंधारकडील कथा, बदनसीब व अन्य पुस्तकांच्या बाबतीत अनेक प्रश्न विचारले, ज्याला अतिशय दिलखुलासपणे प्रतिभाताईंनी उत्तरे दिली.
पती रानडे हे केंद्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागात आíकटेक्चर म्हणून कार्यरत असल्याने कोलकत्ता, मणिपूर, शिलांग, दिल्ली, काबूल, मुंबई या ठिकाणी प्रतिभाताईंनी वास्तव्य केले. या दरम्यान आलेले अनेक अनुभव त्यांनी आपल्या विविध पुस्तकांतून मांडले, ज्याला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. काबूलच्या वास्तव्यात असताना खान अब्दूल गफारखान आपल्या घरी आल्याचीही त्यांनी आठवण सांगितली.
दुर्गाबाईंशी स्न्ोह निर्माण झाल्यानंतर त्यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली. त्याच्या ९ कॅसेट आपल्याकडे आहेत. यावर उपस्थित प्रा. शेखर कुलकर्णी यांनी या कॅसेट सीडी स्वरूपात आणण्याची विनंती केली. या कल्पनेला दाद देत प्रतिभाताईंनी लवकरच या सीडी तयार करण्याची ग्वाही दिली. राम देशपांडे यांनीही याबाबत त्यांच्याशी चर्चा केली. या वेळी टी. डी. कुलकर्णी, इतिहास संकलन समितीच्या वैशाली गोखले, प्रा. नीला जोशी यांच्यासह उपस्थितांनी चच्रेत सहभाग घेतला. रिवद्र जोशी यांनी स्वागत केले तर समीर देशपांडे यांनी आभार मानले.