राज्य शिखर बँकेची कारवाई न्यायालयाच्या आदेशाने सुरू आहे. त्यामध्ये राज्य सरकारच्या हस्तक्षेप नाही. ईडी ही स्वायत्त संस्था असून त्यांना त्यांची कार्यवाही करू दिली पाहिजे. पण आपण अडचणीत येतो असे वाटल्याने ईडीच्या कारवाईच्या नावावर हौतात्म्य मिळवण्याचा काहींचा प्रयत्न आहे, अशा शब्दात भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी शुक्रवारी येथे बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना टोला लगावला.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सहस्रबुद्धे यांनी येथे भाजपच्या समाज माध्यम हाताळणाऱ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. केंद्र व राज्य सरकारच्या पाच वर्षांतील यशस्वी कामगिरीचा त्यांनी आढावा घेत विकासकामांच्या जोरावर भाजप जनमानसात पोहोचले आहे, असा दावा त्यांनी केला. त्यांच्यासमवेत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष मकरंद देशपांडे होते.

लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व जनादेश, आताही सकारात्मक वातावरण, पहिल्या १०० दिवसांत प्रभावी कामगिरी याआधारे भाजप लोकांचा विश्वास सार्थ करत आहे. काँग्रेस दुसऱ्यांदा केंद्रात सत्तेवर येताच मोठे घोटाळे झाले होते. या वेळी त्या पक्षातही शिथिलता आली. याउलट भाजपने दुसऱ्यांदा सत्तास्थानी आल्यावर आR मक कामकाज सुरू केले.

समान नागरी कायदा दिशेने पाऊ ल टाकताना मुस्लीम महिलांना जाचक ठरणारा तिहेरी तलाक रद्द केला. काश्मीरचे ३७० कलम रद्द केले, गोहत्या बंदी प्रभावीपणे राबवली. खरे तर हे तिन्ही विषय राज्यघटनेत आहेत, तो काही केवळ भाजपचा अजेंडा नाही तर राष्ट्रीय अजेंडा आहे, असे नमूद करीत त्यांनी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे समर्थन केले.

मोदींच्या नेतृत्वामुळे आंतरराष्ट्रीय क्षेत्रात भारताचा दबदबा वाढला. ‘हौडी मोदी’ असे म्हणत केलेले त्यांचे स्वागत म्हणजे अमेरिकेच्या इतिहासातील पहिली घटना आहे. आंतराष्ट्रीय पातळीवर मुत्सद्दी म्हणून मोदींची प्रतिमा उंचावली गेली. पेट्रोलियम पदार्थाचे दर आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरवले जातात, त्याला सरकारला जबाबदार धरता येणार नाही. लोकांना विकासाच्या प्रRि येत सहभागी करून घेणारे हे सरकार आहे.

पर्यावरण हिताचा विचार करून मोदी यांनी आता प्लास्टिक मुक्त भारत उपR म राबवण्यास सुरुवात केली आहे. केवळ बंदी घालून उपयोग नाही तर लोकसहभाग महत्त्वाचा आहे, असे ते म्हणाले.

आर्थिक मंदी हे सरकारचे अपयश नव्हे, असा उल्लेख करून ते म्हणाले, परिस्थितीत काहीसा बदल झाला म्हणून सरकार गडबडून गेले नाही. उलट आवश्यक त्या सर्व उपाययोजना सुरू आहेत.

निवडणूक कोणतीही असो, नेते, सरकारची कामगिरी पाहिली जाते, केवळ भावनांचा विचार करून मतदान केले जात नाही. जनता संकुचित विचार करत नाही. मोदी-फडणवीस सरकारची कामगिरी प्रभावी असल्याने त्याला जनतेचा प्रतिसाद मिळत आहे. शिवाय भाजपाचे वैशिष्टय़ हेच आहे, की हा पक्ष कामगिरीवर आधारित मत मागतो, असे ते म्हणाले.