पुरेशा पावसाअभावी कोल्हापूर जिल्’ाातील कोरडवाहू क्षेत्रातील भात पिकाच्या वाढीवर परिणाम झाला आहे. रोपलागण झालेल्या भात पिकामध्ये पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्याने उत्पादनामध्ये २० ते २५ टक्के घट येण्याची भीती आहे. तर कमी पावसाचा फटका जिल्’ाातील प्रमुख नगदी पीक असलेल्या उसालाही बसू लागला असून ऊस पिकाच्या वाढीवर परिणाम झाला आहे. शिवाय, पक्वतेस आलेल्या उसामध्ये काही प्रमाणात लोकरी मावा किडीचा व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येऊ लागल्याने बळीराजा धास्तावला आहे.
या वर्षी पावसाने सुरुवात चांगली केली, तरी नंतर तो गायब झाला. जिल्’ाात सुमारे ६० टक्के पाऊस झाल्याने सर्व प्रकारच्या पिकांमध्ये २५ ते ४० टक्के इतकी घट झाली. यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष रब्बी पिकाकडे लागले असून कितपत उत्पादन येणार याचा अंदाज लावण्यात शेतकरी व्यग्र आहे. यंदाच्या रब्बी हंगामातील पेरण्यांना सुरुवात झालेली आहे. यामध्ये प्रामुख्याने रब्बी ज्वारी व हरभरा पिकाची पेरणी सुरू असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन आटोळे यांनी शुक्रवारी दिली.
जिल्’ाात भात पीकाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ११ हजार हेक्टर असून १ लाख ३ हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची पेरणी झालेली आहे. सद्य:स्थितीत रोपलागणीचे भात पक्वतेच्या अवस्थेत आहे. हळव्या वाणाच्या काढणीस सुरुवात झाली आहे. गरव्या व निमगरव्या वाणाचे भात काढणीच्या अवस्थेत आहे.
नागली पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र २३ हजार हेक्टर असून २०६९६ हेक्टर क्षेत्रावर नागली पिकाची पेरणी झालेले नागली पिक पक्वतेच्या ते काढणीच्या अवस्थेत आहे. सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र ५६४६० हे. असून ४२८९९ हे. क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी झालेली आहे. सद्य:स्थितीत पिकाची काढणी पूर्णत्वाकडे आहे.
भुईमुग पिकाचे ४८२१२ हे. क्षेत्रावर भुईमूग पिकाची पेरणी झालेली असून पिक पक्वतेच्या अवस्थेत आहे.
जिल्ह्य़ाचे ऊस पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र १ लाख १७ हजार हेक्टर आहे. सन २०१४-१५ मध्ये १ लाख ४५ हजार हेक्टरवर लागवड झालेला ऊस व  खोडवा पिक जोमदार वाढीच्या ते पक्वतेच्या अवस्थेत आहे.  आडसाली उसाची उगवण चांगली असून पीक वाढीच्या अवस्थेत आहे. पिकामध्ये आंतर मशागतीची कामे सुरू आहेत.