येत्या 25 तारखेला रमझान ईद आहे. करोनाचे संकट आपल्या घरावर आलेले आहे. ते वैश्विक आहे असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता काम नये. सर्व सावधानी बाळगत  घरी  मुस्लिम बांधवांनी सण साजरा करावा.या कठीण काळात संयम बाळगून ही साथ आपल्या कुटुंबात येणार नाही याची काळजी घ्यावी असे, आवाहन स्वराज इंडिया महाराष्ट्र यांनी केले आहे.

या काळात ज्या आवश्यक वस्तू म्हणजे अन्नधान्य, दूध, फळे याचा पुरवठा व्यवस्थित होईल हे सरकारने बघणे गरजेचे आहे. याच काळात मांसाहार मोठ्या प्रमाणात केला जातो. या करता कोंबड्या, बकरे व बोकड, मासे यांचा पुरवठाही होईल हे शासन व पोलीस यांनी पहाण्याची गरज आहे.

सर्वाना रमझानच्या शुभेच्छा देत असतानाच या काळात सामाजिक सौहार्द बिघडणार नाही याचीही काळजी सरकारने घेतली पाहिजे. जनतेने या प्रसंगात अत्यन्त संयम दाखवला आहे. तो तसाच यापुढे ही दाखवावा व नियम पाळून आपले सण साजरे करावेत,असे आवाहन स्वराज्य इंडिया-महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ललित बाबर, अण्णासाहेब खंदारे, प्रा.ओमप्रकाश कलमे, प्रत्युष, सुभाष लोमटे, मानव कांबळे, वंदनाताई शिंदे, इस्माईल समडोळे, शकील अहमद, आलोक कांबळे, महेंद्र माली, संजीव साने यांनी केले आहे.