प्लास्टर ऑफ पॅरिसचा (पीओपी) वापर पर्यावरणाला घातक असल्याची चर्चा असताना येथे अवघ्या आठ तासांत श्री मूर्ती विरघळविण्याचा प्रयोग पंचगंगा नदीघाटावर करण्यात आला. या प्रयोगामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल, असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला.

वाढत्या जलप्रदूषणामुळे गणेशमूर्ती पर्यावरणपूरक असावी असा मतप्रवाह रुजत आहे. शाडू, लाल माती, कागद यापासून मूर्ती बनवली जात आहे. या मूर्ती घेण्याकडे कल  वाढत  आहे. दुसरीकडे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीला विरोध होत आहे. ती  पाण्यात लवकर विरघळत नाहीत, त्यामुळे विसर्जनानंतर दहा दिवस मनोभावे पूजलेल्या गणेशमूर्तीची होणारी अवस्था भक्तांसाठी क्लेशकारक असते. शिवाय जलाशयाचे प्रदूषण होते, ही गोष्ट वेगळीच.

शाडू मिळत नाही आणि प्लास्टर ऑफ पॅरिसला पर्याय नाही, या पेचातून नॅशनल केमिकल लॅबोरेटरीने याबाबत नवे संशोधन केले आहे.

मूर्तीच्या वजनाइतकाच अमोनियम बाय काबरेनेट म्हणजे खाण्याचा सोडा विसर्जन करावयाच्या भांडय़ातील पाण्यात मिसळला की त्यात विसर्जन केलेली मूर्ती २४ ते ४८ तासांत विरघळते. हे पाणी मूर्तीवर अभिषेकाप्रमाणे अखंडपणे सोडत राहिले तर आठ तासांत मूर्ती विरघळते. हाच प्रयोग पंचगंगा नदीघाटावर करण्यात आला.

रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशिनग सíव्हसिंग सेक्टर सोसायटीचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष प्रमोद पुंगावकर, शैलेश टांकसाळकर, राजेंद्र इंगवले, अतुल इंगळे यांनी काचेच्या पेटीत प्लास्टर ऑफ पॅरिसची एक मूर्ती ठेवली. त्यावर अखंडपणे पाण्याची धार सोडली. पंधराव्या मिनिटांनंतर मूर्तीचे बाहय़ पापुद्रे निघण्यास सुरुवात झाली.

शनिवारी घरगुती गौरी-गणपतीचे विसर्जन आहे. त्या पाश्र्वभूमीवर केलेल्या या प्रयोगाला नागरिकांची साथ मिळाली तर जलप्रदूषणाच्या प्रश्नाचे गांभीर्य काहीअंशी तरी कमी होणार आहे.

या वेळी निशिकांत िभगार्डे, उज्ज्वल नागेशकर, कौशल शिर्के, चंद्रकांत परुळेकर, मनीषा पोटे यांच्यासह कार्यकत्रे उपस्थित होते. यंदाच्या वर्षी गणेशमूर्ती विसर्जनावेळी महापालिकेच्या वतीने अमोनियम बाय काबरेनेटचे पाणी असलेले एक विसर्जन कुंड ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती या कुंडात विसर्जति कराव्यात. त्याला प्रतिसाद आला तर पुढच्या वर्षी नागरिकांनी मूर्ती घरीच विसर्जति करावी, असे आवाहन महापालिका उपायुक्त विजय खोराटे यांनी केले.