कोल्हापूरमध्ये १४ शेतकरी कंपन्यांची स्थापना करण्यात आली असून, या कंपन्यांचे उत्पादक शेतकरीच सभासद आहेत. त्यांना कृषी व पणन विभागामार्फत उत्पादनवृद्धी, दरांची स्थिरता, निर्यातवृद्धीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल. उत्पादित मालाची ब्रँड निश्चितीमुळे शेतमालाला किफायती दर मिळेल, असे मत विभागीय कृषी सहसंचालक नारायण शिसोदे यांनी येथे केले. कोल्हापूरच्या शेतकरी कंपन्यांकडून घेण्यात आलेले ‘किंग्ज ब्रँड’चे उत्पादन ही गौरवाची बाब असल्याचा उल्लेख त्यांनी केला.
विभागीय कृषी सहसंचालक, आत्मा, जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या वतीने व जळगावच्या केळी संशोधन केंद्राच्या साहाय्याने येथे फळे व भाजीपाला क्षेत्रातील प्राथमिक केळी उत्पादन व केळी निर्यातदार जनजागृती प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता.
शिसोदे म्हणाले, ग्राहकांची भाजीपाला उत्पादनांची दैनंदिन आवश्यकता विचारात घेऊन गृहनिर्माण संस्था, तसेच अन्य विविध ठिकाणी ग्राहकांची गरज पूर्ण होणे आवश्यक आहे. कोल्हापूर जिल्हय़ातील तळसंदे, सांगली जिल्हय़ातील आटपाडी, सातारा जिल्हय़ातील मसूर आदी ठिकाणी मालाची साठवणूक करण्यासाठी केंद्र निर्माण केले आहेत. कोल्हापूर, पुणे, मुंबईसह देशातील विविध ठिकाणी मालाची निर्यात करण्यासाठी अशी केंद्रे आवश्यक आहेत. शेती मालाची आवक जास्त झाल्यामुळे दर कमी होतात. अशा वेळी शेतीमालावर प्रक्रिया करून उपउत्पादने फायदेशीर ठरेल. कागल नगरपालिकेने शेतकऱ्यांना जागा उपलब्ध करून दिल्यामुळे दर गुरुवारी व रविवारी शेतकरी कंपन्या थेट बाजारात मालाची विक्री करतात, अशी केंद्रे अन्यत्र मिळाल्यास शेतकऱ्यांना आíथक स्थैर्य मिळेल. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या आयोजनामागील पाश्र्वभूमी विशद केली. कृषी संचालक गोिवद हांडे, विनिता सुधांशू मिश्रा, रवींद्र पवार, प्रा. सुरेश परदेशी, डॉ. विष्णू गरंडे, डॉ. शशिकांत, कृषी उपसंचालक सुरेश मगदूम, पणनचे उपमहाव्यवस्थापक सुभाष घुले उपस्थित होते.