18 November 2017

News Flash

कर्जमाफीच्या मागणीसाठी कोल्हापुरात शिवसेनेचा मोर्चा

शेतकरी त्याला साहाय्य करण्यासाठी राज्य शासनाने कर्जमाफीचा निर्णय घोषित केला आहे.

प्रतिनिधी, कोल्हापूर | Updated: July 11, 2017 3:20 AM

शेतीकर्जाचा लाभ याचा फलक बँकेसमोर लावून प्रत्यक्ष आकडेवारी जाहीर करावी, या मागणीसाठी सोमवारी येथे शिवसेनेच्या वतीने ढोलताशा बडवत आंदोलन केले.

शासनाकडून जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी फसवी आहे. त्याचा अत्यल्प शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. हा आकडा नेमका किती आहे हे स्पष्ट करणारा लाभार्थी शेतकरी आणि त्यांना मिळालेला शेतीकर्जाचा लाभ याचा फलक बँकेसमोर लावून प्रत्यक्ष आकडेवारी जाहीर करावी, या मागणीसाठी सोमवारी येथे शिवसेनेच्या वतीने ढोलताशा बडवत आंदोलन केले. या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकेच्या प्रधान कार्यालयावर तिन्ही जिल्हाप्रमुखांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. बँकेचे व्यवस्थापक जी. एम. िशदे यांनी दोन दिवसांत लाभार्थीची यादी बँकेच्या सर्व शाखांसमोर लावण्याचे मान्य केले.

शेतकरी त्याला साहाय्य करण्यासाठी राज्य शासनाने कर्जमाफीचा निर्णय घोषित केला आहे. मात्र राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील वारंवार निकष बदलल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. कर्जमाफीचा शेतकऱ्यांना होणारा लाभ दिवसेंदिवस लांबत असल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने राज्यभरात आज एकाच वेळी मोर्चा काढण्यात आला. कोल्हापुरात संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव हे तीन जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, बाजीराव पाटील, दुग्रेश िलग्रस, महादेव गौड, सयाजी चव्हाण, कमलाकर जगदाळे, शशिकांत बिडकर, महिला आघाडी प्रमुख शुभांगी पोवार, मंगला चव्हाण, रिया पाटील, दीप्ती कोळेकर, स्मिता सावंत, माधुरी ताकारे, रेखा जाधव मोर्चात सहभागी झाले होते.

संजय पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केलेली ३४ हजार कोटीची कर्जमाफी ही फसवी असून, खोटी आकडेवारी जाहीर केल्याचा आरोप केला. कर्जमाफीचा लाभ मूठभर शेतकऱ्यांनाही मिळाला नाही, तरीही मुख्यमंत्री फडणवीस मात्र मोठमोठय़ा वल्गना करत शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचे दाखवत आहेत. या वेळी विजय देवणे यांनी देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांचे देणेघेणे नसल्याने ती अशी फसवी कर्जमाफी जाहीर करत आहेत. त्यामुळे ते ‘फडणवीस’ आहेत, की ‘फसणवीस’ आहेत, अशी शंका शेतकऱ्यांतून घेतली जात आहे, असे परखड मत व्यक्त केले.

First Published on July 11, 2017 3:15 am

Web Title: farmers debt relief shiv sena kolhapur