News Flash

करोनाने हिरावले आईवडील, दोन्ही बालके पोरकी!

शाहूवाडी तालुक्यातील या दुर्दैवी घटनेने सगळय़ांचेच मन हेलावले आहे.

कोल्हापूर : करोनाबाधित पत्नीपाठोपाठ पतीचेही निधन झाले. काम संपवून परत येतो असे सांगून गेलेले आई वडील कायमचे अंतरल्याने त्यांची दोन्ही बालके पोरकी झाली आहेत. शाहूवाडी तालुक्यातील या दुर्दैवी घटनेने सगळय़ांचेच मन हेलावले आहे.

शित्तूर पैकी मलकापूर या गावातील हे मूळचे कुटुंब. उभयता उच्चशिक्षित. ते पुण्यातील मोठय़ा कंपनीत नोकरी करत होते. एक मुलगा व मुलगी यांच्या समवेत हे सुखी कुटुंब पुण्यात स्थायिक झाले होते. करोना संसर्ग वाढल्यावर कंपनी काही काळासाठी बंद झाली. त्यांनी गावाकडे येण्याचा निर्णय घेतला.

दोन दिवसानंतर पत्नीला प्रकृतीचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे दोघांनीही करोना तपासणी केली असता ती सकारात्मक आली. आपल्या दोन्ही मुलांना त्यांनी थोडय़ा वेळातच काम आवरून परत येतो अशी समजूत घालून, ते उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल झाले. दोन दिवसापूर्वी पत्नीचा मृत्यू झाला. निराशेच्या गर्तेत असलेल्या पतीचा काल रात्री मृत्यू झाला. माता-पित्याचे छत्र हरपल्याने सहा व आठ वर्षांची बालके पोरकी झाली आहेत. ते आई वडील घरी येण्याची वाट पाहत आहेत. त्यांना आई—वडिलांची करुण कहाणी अद्याप समजलेली नाही. त्यांची समजूत कशी काढायची या विचाराने नातेवाईक अस्वस्थ झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2021 12:05 am

Web Title: father and mother die of covid in kolhapur zws 70
Next Stories
1 कोल्हापूर जिल्ह्यातीलआरोग्य उपकेंद्रांसाठी 18 कोटीचा निधी मंजूर – सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर
2 कोल्हापुरात गारांचा जोरदार पाऊस
3 राज्यातील बांधकाम मजुरांच्या खात्यात १३७ कोटींचा निधी जमा
Just Now!
X