News Flash

राधानगरीचे दरवाजे उघडले

कोल्हापूर जिल्ह्य़ाला पुराचा धोका

कोल्हापूर जिल्ह्य़ाला पुराचा धोका

पावसाची संततधार तिसऱ्या दिवशी कायम राहिल्याने कोल्हापूर जिल्ह्णााला पुराचा धोका निर्माण झाला आहे. राधानगरी धरण ओसंडून वाहत असून ५ दरवाजे उघडले आहेत. राजाराम बंधाऱ्याची पाणीपातळी सायंकाळी २ फू ट वाढून ३६ फूट झाल्याने रात्री पाणीपातळी आणखी वाढून ते पुन्हा शहरात घुसण्याची शक्यता आहे. २ राज्य मार्ग तर ६ प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतूक बंद झाल्याने प्रवाशांची गरसोय झाली आहे. जिल्ह्य़ातील ३६ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

पावसाचा जोर कोल्हापूर जिल्ह्णात आणखी वाढला आहे.  शाहूकालीन राधानगरी धरण पूर्ण भरले आहे. सायंकाळी पावणेसहा ते साडेसहा या वेळेत एकूण ५ दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे ८८००क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. परिणामी पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाटय़ाने वाढ होत आहे. राजाराम बंधाऱ्यात दिवसभरात २ फू ट वाढ झाली.

जिल्ह्णाात गेल्या २४ तासांत गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक १०२ मि.मी. पावसाची नोंद  झाली आहे.  गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्य़ात पावसाची संततधार सुरू असून आज सकाळी ७ वाजेपर्यंत राजाराम बंधाऱ्याची पाणीपातळी ३३ फूट ४ इंच इतकी असून पावसामुळे नद्यांवरील ३६ कोल्हापूर पध्दतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

शिवाजी पर्याय पूल चर्चा

कोल्हापूर ते रत्नागिरी जोडणारा पूल म्हणजे शिवाजी पूल. १०० वर्षांची मुदत संपल्याने नवीन पूल बांधला जात आहे . मात्र तक्रारी, चुकीची पद्धत आणि केंद्रीय पुरातत्त्व खात्याची आडकाठी यामुळे पर्यायी पुलाचे काम वर्षभर रेंगाळले आहे. जुन्या पुलाची मुदत संपली आहे. महाड येथे जुना पूल वाहून गेल्याने घडलेल्या दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर येथील पर्यायी पुलाचे काम लवकर पूर्ण व्हावे, या मागणीला आज जोर चढला.

कोयनेचा जलसाठा ७२.६६ टीएमसीवर

कराड : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरण ६९.३५ टक्के भरले असून, हा जलसाठा ७२.६६ टीएमसीवर पोहोचला आहे. सध्या धरणत ८५,१५८ क्युसेक पाण्याची प्रतिसेकंदास आवक होत आहे. बुधवारी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पुणे जिल्ह्णानतील नीरा-देवघर धरणक्षेत्रात सर्वाधिक २२४ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. टेमघर १२८, वरसगाव १०१, पानशेत ९४, मुळशी ८२, धोम बलकवडी ७६, तर वारणा धरणक्षेत्रात ३७ मि. मी. पाऊस कोसळला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2016 2:18 am

Web Title: flood risk to kolhapur district by heavy rainfall
Next Stories
1 खड्डा चुकविताना महिलेचा मृत्यू
2 कोल्हापुरात ३६ बंधारे पाण्याखाली
3 इचलकरंजीजवळ पंचगंगेच्या पातळीत झपाटय़ाने वाढ
Just Now!
X