कोल्हापूर : राधानगरी-भुदरगडचे मतदार संघाचे माजी आमदार नामदेवराव शंकरराव भोईटे (वय ७९) यांचे मंगळवारी येथील अस्टर आधार हॉस्पिटलमध्ये प्रदीर्घ आजारानंतर निधन झाले. जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रात भोईटे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती.

पालकरवाडी (ता. राधानगरी) येथे सामान्य कुटुंबात भोईटे यांचा जन्म झाला. ते शिक्षकी पेशात असले तरी त्यांचा ओढा राजकारणाकडे होता. त्यातून ते राधानगरी पंचायत समितीवर निवडून आले. सभापती म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केले. पुढे ते काँग्रेस पक्षाकडून जिल्हा परिषदेवर निवडून गेल्यावर अभ्यासू सदस्य अशी प्रतिमा त्यांनी निर्माण केली.

nagpur bhaskar jadhav marathi news, bhaskar jadhav eknath shinde marathi news
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता राजकीय निवृत्ती घेतील का?”; भास्कर जाधव म्हणाले, “तीन खासदारांचे तिकीट नाकारून…”
Sangli Lok Sabha candidacy Congress workers focus on Delhi decision
सांगली लोकसभा उमेदवारी काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष दिल्लीच्या निर्णयाकडे
ahmednagar lok sabha
विखे-पाटील यांच्या माफीनाम्यानंतरही भाजपमधील निष्ठावंतांची नाराजी कायम
sharad pawar arvind kejriwal
“केजरीवालांच्या अटकेमुळे निवडणुकीत आम आदमी पार्टीला…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “मी इंडियाचा घटक म्हणून…”

त्यांनी राधानगरी-भुदरगड  मतदार संघात काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. ती न मिळाल्याने १९९५ त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. तेव्हा राज्यात युतीचे सरकार असल्याने त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला.

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर ते पवारांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जाऊ लागले. शिक्षण क्षेत्रात त्यांना रुची असल्याने मतदार संघात त्यांनी अनेक शिक्षण संस्था निर्माण केल्या. मुदाळ येथील हुतात्मा वारके सहकारी सूतगिरणीचे ते अध्यक्ष होते.