कोल्हापूर : बनावट निर्मिती आणि वितरित करण्याबद्दल कोल्हापुरात आज चार जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ५२ हजार ५८८ बनावट नोटांसह त्या तयार करण्यासाठी लागणारी यंत्रणा पोलिसांनी जप्त केली आहे. ही कारवाई कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने ,कागल तालुक्यातील बाचणी येथे केली. लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम सूरु असताना तापलेल्या राजकीय गरमागरम वातावरणात बनावट नोटा बाहेर आल्याने कोल्हापूर जिल्ह्यत चर्चेला उधाण आले आहे.

बाळू सुलेमान नायकवडी वय ५६ (कागल),विक्रम कृष्णात माने (वय ३२, भुदरगड) ,प्रवीण नारायण गडकर वय ३६ (रा.भुदरगड),गुरूनाथ दादू  पाटील (वय २५ भुदरगड) ही अटक केलेल्या आरोपींची नांवे आहेत. स्थानिक गुन्हा अन्वेषणचे हवालदार अमोल आकाराम कोळेकर यांनी याबाबत कागल पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आरोपी नायकवडी,गडकर,माने यांनी संगनमताने बनावट नोटा तयार करण्याची योजना आखली. गुरूनाथ पाटील यांस नोटा तयार करण्यालाठी लागणारी मशिनरी पुरविली. गुरूनाथने आपल्या घरातच कलर प्रिंटर कम स्कँनद्वारे छापखाना सुरू केला. भारतीय चलनातील रुपये २ हजार ,५००,२०० च्या रुपये ५२ हजार ५८८ च्या नोटा तयार करून बाजारात आणल्या.त्याची किंमत सुमारे २० लाख ३हजार ५०० इतकी होते.

बुधवारी दुपारी आरोपींनी बाचणी येथील बसस्थानक परिसरात बनावट खपविण्यास सुरूवात केली. नोटांबाबत कांहीना संशय आला. ही बातमी कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागास मिळाली. त्यांनी सापळा रचून चार आरोपीना रंगेहाथ पकडले.त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच बनावट नोटांचे बंडलपोलिसांसमोर टाकले.