फुगे फुगवण्याच्या गॅस टाकीचा भीषण स्फोटात एक १२ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे. सना पठाण असं या मुलीचं नाव असून, तिचे तिचे दोन्ही हात आणि पाय निकामी झाले आहेत. इचलकरंजीतील कोल्हापूर नाक्यावरील स्वामी मळ्यात ही घटना घडली.

इचलकरंजी येथील कोल्हापूर नाक्यावरील स्वामी मळा वस्ती आहे. इथे सना पठाण ही मुलगी दारात खेळत होती. खेळत असतानाच अचानक फुगे फुगवण्याच्या गॅस सिंलिडरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, सनाचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय निकामी झाले. तिला तातडीनंं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्राथमिक उपचारानंतर तिला कोल्हापूरला हलवण्यात आलं आहे.

घटनेनंतर पोलीस उपअधीक्षक गणेश बिरादार व शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी घटनास्थळाला बेट दिली.